भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आज आयसीसीने केलेल्या ट्विटला उत्तर देताना घरुन काम करणं सोप्पं नसल्याचं म्हटलं आहे. आयसीसीने एक फोटो केल्यानंतर रोहितने हे उत्तर दिले आहे.
आयसीसीने एक कोलाज असलेला फोटो आज पोस्ट केला होता. यात त्यांनी ‘सर व्हिव्हीयन रिचर्ड्स, हर्षल गिब्ज, रिकी पाॅटींग व विराट कोहली यांपैकी कोण चांगला पुल शाॅट मारते’ असा प्रश्न केला होता.
Which batsman, past or present, has the best pull shot, in your opinion? 👀 pic.twitter.com/TAXf8rr3el
— ICC (@ICC) March 22, 2020
यावर रोहित शर्माने या ट्विटला कोट करत ‘येथे कुणीतरी नाही आहे. माझ्या मते घरुन काम करण तुम्हाला अवघड जातंय,’ असा निशाणा साधला.
Someone’s missing here ?? Not easy to work from home I guess https://t.co/sbonEva7AM
— Rohit Sharma (@ImRo45) March 22, 2020
यावर आयसीसीने लगेच ‘फेअर प्ले रोहित’ असं म्हणतं रोहितचा एक पुल शाॅट खेळलेला व्हिडीओ शेअर करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु रोहितने याला काहीही उत्तर दिले नाही.
Fair play, Rohit. pic.twitter.com/SGWtRajPwk
— ICC (@ICC) March 22, 2020
यावर प्रेक्षकांनी मात्र आयसीसीला अनेक प्रश्न करत भंडावुन सोडले व रोहितला कोलाजमध्ये न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
@RickyPonting @ImRo45 https://t.co/lJ9YakEAFl
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 22, 2020
Which batsman, past or present, has the best pull shot, in your opinion? 👀 pic.twitter.com/TAXf8rr3el
— ICC (@ICC) March 22, 2020
विशेष म्हणजे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही आयसीसीला उत्तर देताना ‘रोहित व पाॅटींग’ असे म्हटले आहे. केविन पीटरसनने मात्र अॅंड्रू ह्युसन यांचे नाव घेतले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका
-तीने माझं फेसबुक अकाऊंट हॅक केलं, तेव्हापासून मी एफबी वापरणं सोडलं
-आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू