भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि करोडो क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या रोहित शर्माचा आज बर्थडे. रोहित 36 वर्षांचा झाला. अफाट लोकप्रियता मिळवलेल्या रोहितच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसून येतात. अगदी आपली प्रतिमा जपण्याचा कोणताही खोटा प्रयत्न त्याच्याकडून झालेला दिसत नाही. जे काय असेल ते खुल्लम खुल्ला. कधी तो सहकाऱ्यांवर ओरडताना, चिडताना दिसतो. तर कधी खेळ भावना दाखवत विरोधी संघाचे मन त्याने जिंकले. या सर्वात भाव खाऊन जातो त्याचा हजरजबाबीपणा. त्याच्या याच हजरजबाबीपणाचे काही किस्से आपण माहीत करून घेऊया.
क्रिकेट चाहते आणि क्रिकेटचे जाणकार म्हणतात प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितशी बोलणे ही एक पर्वणी असते. कारण, कोणतेही डिप्लोमॅटिक उत्तर न देता अगदी मनापासून जे काही ओठावर येईल तो ते बोलून जातो. आता पहिला किस्सा सांगायचा झाला तर, 2018 आशिया कप जिंकल्यानंतर त्याला विचारले गेले, “तू आयपीएलमध्ये इतका यशस्वी आहे कर्णधार आहेस, निदास ट्रॉफी जिंकून दिली, आता आशिया कप जिंकून दिला. मोठ्या कालावधीसाठी तुला भारतीय संघाचा कर्णधार व्हायला आवडेल का?” त्यावर दुसऱ्या क्षणी एक स्माईल करत, उत्तर दिले, “हो, मी तयार आहे” चवीने चघळल्या जाणाऱ्या या विषयाला त्याने इतक्या सहजतेने उत्तर देत या प्रश्नातील हवाच काढून टाकली..
नक्की वाचा- सर्वसाधारण घरातून आलेल्या रोहितची गोष्ट, ज्याला पाहून विराटही म्हणालेला, ‘ये चीज ही अलग है’
एकदा आपल्या खुमासदार प्रश्नांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनंदन लेले यांनी अजिंक्य रहाणेचे कौतुक करताना, “साला चाबुक बॅटिंग करता है” असे म्हटले. त्यावर रोहितने त्यांचा हाच शब्द पकडला. हसत हसत तो म्हणाला, “यार, साला मत कहो, हम बचपन से साथ साथ है..” आता लेलेंचा विषय निघालाच आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा कधी हे दोन्ही मराठी लोक समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यातील जुगलबंदी पाहण्यासाठी असते. तसे तर हे दोघेही मराठी बोलण्यात वाकबगार आहेत. मात्र, 2021-2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध च्या मालिकेआधी त्याने इतर पत्रकारांना “जरा सुनंदन सरांसारखे प्रश्न विचारत जा” म्हणून थेट सुनावले होते.
याच्या दोन वर्ष आधी म्हणजे 2019 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला मात दिली. अर्थातच रोहितने दमदार शतक ठोकलं होतं. त्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने “पाकिस्तान संघाच्या फलंदाजीच्या त्यांच्या खराब फॉर्म मधून येण्यासाठी तू काय सुचवशील?” असा तिरकस प्रश्न विचारला. त्यावर रोहितच्या “मी पाकिस्तानचा कोच झाल्यानंतर सांगेल” या उत्तराने संपूर्ण सभागृहात हशा पिकला. वर्ल्डकपवेळीच रोहितने एका प्रश्नाचे उत्तर देताना थेट असे म्हटले होते की, “भारत -पाकिस्तान सामन्याला आमचेच प्रेक्षक जास्त असतात” अशात त्याने थेट पाकिस्तानी संघाच्या मनोधैर्यावर घाला घातला होता.
सन 2018च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी ही त्याने “मिडल ऑर्डरला संधी मिळावी म्हणून, आम्ही रिटायर हर्ट होऊन बाहेर येऊ शकत नाही” असे मिश्किलपणे म्हटलेले.
रोहित विसराळू म्हणून पूर्ण क्रिकेट जगतात बदनाम आहे. त्याच्या विसराळूपणाचा एक किस्सा 2017 आयपीएल जिंकल्यानंतर घडला. पत्रकाराने रोहित व पार्थिव पटेल यांना सलग तीन चार प्रश्न विचारले. ज्यावेळी रोहितला उत्तर विचारले तेव्हा रोहितची हीच खुबी समोर आली. “आता मी प्रश्न विसरलो” असे म्हणत त्या पत्रकाराच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले.
अगदी नवनव सांगायचं झाल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान नागपूर कसोटी जतीन सप्रू आणि इरफान पठाण यांना दिलेला इंटरव्यू युट्युबला जाऊन पाहा. आताचा माजी क्रिकेटपटू व अनेक वर्ष रोहितचा सहकारी राहिलेला हरभजन सिंग वारंवार म्हणतो, “रोहित इतका साफ मनाचा माणूस तुम्हाला दुसरा मिळणार नाही” याचे उत्तरच त्या इंटरव्यूमध्ये मिळून जाते. (Rohit sharma in press conference )
हॅप्पी बर्थडे रोहित
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आज कोट्यावधींचा मालक असलेल्या रोहितकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, ‘अशी’ भागवायचा गरज
‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या 10 गोष्टी, एका क्लिकवर घ्या जाणून