इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यात दोन्ही संघ आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. सध्या लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला जातोय.
रोहितने केली रिषभची बरोबरी
या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंनी अनेक विक्रम रचले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. अशातच भारतीय संघातील खेळाडूंनी देखील अनेक विक्रम बनविले. त्यातील एक म्हणजे २०२१ मध्ये सर्वाधिक ५० पेक्षा धावा करण्याचा विक्रम होय.
रोहित शर्माने तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत या यादीमध्ये मोठी मजल मारली. या आधी श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करूनारत्ने आणि भारताचा रिषभ पंत हे यंदाच्या वर्षी सर्वाधिक ५० पेक्षा धावा करणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर होते. आता रोहितदेखील वर्षातील आपले ५ वे अर्धशतक ठोकत या यादीत सामील झाला आहे. चालू वर्षी कसोटीमध्ये सर्वाधिक जास्त ५० पेक्षा धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावे असून, त्याने ७ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर श्रीलंकेचा क्रिकेटपटू लाहिरू थिरीमन्नेने सहा वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवशी भारताचे पुनरागमन
सामन्याच्या पहिल्या दोन दिवसावर यजमान इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यांना ३५४ धावांची मोठी आघाडी मिळाली होती. मात्र, भारताच्या फलंदाजांनी आपल्या दुसऱ्या डावात अतिशय धैर्याने फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्मासह तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने नाबाद अर्धशतक झळकावले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने २ बाद २१५ धावा केल्या होत्या. भारत अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर असून चेतेश्वर पुजारा नाबाद ९१ तर, कर्णधार विराट कोहली ४५ धावांवर खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहितला पूल शॉट खेळण्यापासून रोखणार नाही, मात्र…” फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे भाष्य
पुण्यात नीरज चोप्राच्या नावाने स्टेडियमचे उद्घाटन, ‘गोल्डन बॉय’ने ‘या’ शब्दात मानले आभार
बिग ब्रेकिंग! एका तपानंतर ख्रिस्टीआनो रोनाल्डो पुन्हा खेळणार मँचेस्टर युनायटेडसाठी