भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना तो जखमी झाला होता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो मागील काही सामन्यांना मुकला होता. या दुखापतीमुळे नोव्हेंबर 2020 मध्ये सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्याची निवड करण्यात आली नाही. मात्र, आता आयपीएलमधील पुनरागमनाबद्दल मुंबईचा प्रभारी कर्णधार कायरान पोलार्डने महत्त्वाची माहिती दिली आहे.
रोहितच्या तब्येतीत सुधारणा
आयपीएलमध्ये शनिवारी (31 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बोलताना पोलार्ड म्हणाला की, “रोहितच्या दुखापतीत सुधारणा होत आहे आणि आशा आहे की तो लवकरच परत येईल.”
रोहित 3 नोव्हेंबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या अखेरच्या साखळी सामन्यात मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु शनिवारी (31 ऑक्टोबर) मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.त्यामुळे 18 गुणांसह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. त्यामुळे अखेरचा साखळी सामना मुंबईसाठी अधिक महत्वाचा नसेल. त्यामुळे कदाचीत या सामन्यासाठीही रोहित विश्रांती घेऊ शकतो.
प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यता
रोहितच्या दुखापतीची निगराणी राखणाऱ्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “रोहित प्ले ऑफमध्ये खेळण्याची दाट शक्यता आहे. एकदा संघाचे गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित झाले की त्याला तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ मिळेल.”
हे वर्ष संघासाठी होतं चांगलं
प्रभारी कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये पोलार्डने 5 सामन्यांत (वेगवेगळ्या हंगामांत) मुंबईला 4 विजय मिळवून दिले आहेत. पोलार्ड संघाच्या सध्याच्या कामगिरीवर समाधानी आहे. पुढील सामन्यातील कामगिरी कशी असावी याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “आम्हाला आगामी दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि अंतिम सामन्यात स्थान मिळवावे लागेल. हे वर्ष आमच्या संघासाठी चांगल होतं.
ईशान किशनला बाद करणे अवघड -पोलार्ड
हैदराबाद विरुद्ध मोलाची कामगिरी करणारा फलंदाज ईशान किशनचे कौतुक करताना पोलार्ड म्हणाला की, “ईशान प्रत्येक सामन्यात चांगले प्रदर्शन करत आहे. जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला बाद करणे अवघड असते. तो संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. परंतु, आता तो सलामीला फलंदाजी करतोय.”
महत्त्वाच्या बातम्या-
आता कोण रोखणार.. ! एक खास योगायोग पुन्हा जुळून आला तर मुंबईचे विजेतेपद पक्के
‘सात समुंदर पार मे…’ प्रेयसीला लग्नासाठी मनविण्यासाठी क्रिकेटरने केला होता ४५ तासांचा प्रवास
पाहावं ते नवलंच! कॅमेराने दाखवला फुटबॉल म्हणून लाईन्समनचा टक्कल
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स