भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला वनडे आणि टी२०चा सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू म्हटले आहे. गंभीर म्हणाला की, “रोहितमधील सुसंगतता कमालीची आहे. त्याचे शॉट्स शानदार असतात. तसेच, तो विरुद्ध संघाच्या गोलंदाजीवर आक्रमकतेने खेळू लागतो, तेव्हा तो रुद्रावतारात असल्याप्रमाणे भासतो.”
वनडे आणि टी२०मध्ये रोहितने आत्तापर्यंत जबरदस्त प्रदर्शन केले आहे. आज मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा देव म्हणण्याचा कोण अधिकारी असेल, तर तो ‘रोहित’ आहे, असे गंभीरने म्हटले आहे.
रोहितच्या कामगिरीला पाहता त्याला एवढा मान देणे वावगे ठरणार नाही. पण नक्की रोहितला वनडेतील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणण्यामागे गंभीरचे काय कारण असावं? याचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे. Why Rohit sharma is worlds best limited overs cricketer?
रोहितने त्याच्या वनडे कारकिर्दीत आत्तपर्यंत २२४ सामने खेळले आहेत. यावेळी ४९.२७च्या सरासरीने त्याने ९११५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या वनडेतील ३ द्विशतकांचा आणि विश्वचषकातील ५ शतकांचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
नोव्हेंबर २०१३ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने २०८ धावा करत वनडेतील पहिले द्विशतक ठोकले होते. त्यानंतर श्रीलंकाविरुद्ध नोव्हेंबर २०१४ला दुसरे आणि डिसेंबर २०१७ला तिसरे द्विशतक केले होते. तर, आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये रोहितने ५ शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता.
रोहितच्या या दमदार विक्रमांमुळे त्याला ‘हिटमॅन’ म्हटले जाते. तर, ‘व्हाईट बॉल क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन’ असेही नाव त्याला देण्यात आले आहे. रोहितला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जर कोण टक्कर देऊ शकत असेल तर तो आहे भारताचा कर्णधार विराट कोहली.
विराटनेही त्याच्या वनडे कारकिर्दीत अनेक विक्रमांचा पाया रचला आहे. त्याने वनडेत आत्तापर्यंत २४८ सामने खेळले आहेत. यावेळी ५९.३३च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४३ शतकांचा आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटची खास गोष्ट अशी की, त्याने एखादे लक्ष्य ठरवले तर तो काही करून ते पूर्ण करतो. अशा प्रकारे त्याने २०वेळा शतके करत भारताला विजय मिळवून दिला आहे. विराट हा रोहितला वनडेत टक्कर देणारा खेळाडू आहे. पण मागील वर्षात त्याची फलंदाजी घसरल्यामुळे रोहितने बाजी मारली.
टी२० क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट या दोघांचेही विक्रम सर्वांना चकित करण्याजोगे आहेत. रोहित हा टी२०मध्ये ४ शतक करणारा एकमेव फलंदाज आहे. तर, विराट हा टी२०त ५०पेक्षा जास्त सरासरी असणारा एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
कसोटी क्रिकेटमधील आजपर्यंतची सार्वकालिन आयसीसी क्रमवारी,…
नशीब चांगले म्हणून टीम इंडियाला मिळणार तब्बल ७ कोटी रुपये?
चाहत्याची मागणी पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधाराने…