fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?

हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील शेवटचा सामना हॅमिल्टन येथे सुरु आहे. या सामन्याच न्यूझीलंडने भारतासमोर २० षटकांत २१३ धावांचे लक्ष ठेवले आहे.

या सामन्यात जेव्हा रोहित शर्मा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्याने ३३ क्रमांकाची जर्सी घातली होती. बीसीसीआयने या सामन्यासाठी जो संघ निवडला आहे त्यात ट्वीटमध्ये ३३ क्रमांकाची जर्सी हार्दिक पंड्याची असल्याचे सांगितले आहे.

परंतु आज जेव्हा रोहित फलंदाजीला आला तेव्हा त्याने ३३ क्रमांकाच्या वर जे हार्दिकचे नाव लिहीले आहे त्यावर टेप लावलेला दिसला.

विशेष म्हणजे मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात देखील रोहितने ५९ क्रमांकाची जर्सी घातलेली दिसली होती. तेव्हा अनेक चाहत्यांनी यापाठीमागचं कारण रोहित तसेच बीसीसीआयला ट्वीटरच्या माध्यमातून विचारलं होतं. असंच कारण आजही चाहते ट्वीटरच्या माध्यमातून विचारताना दिसत आहेत.

तसेच काही चाहत्यांनी ‘रोहितला हार्दिकची जर्सी फिट तरी कशी बसते?’ असा प्रश्न केला आहे.

रोहित नेहमी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ४५ क्रमांकाची जर्सी वापरतो. तसेच त्याचा ट्वीटर आयडी देखील @IMRO45 असा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा

धोनी जादू! हातात बॅटही न घेतलेल्या धोनीच्या नावावर तिसऱ्या टी२० सामन्यात विक्रमांचा विक्रम

You might also like