आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. यजमान आरसीबीने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 विकेट्सने विजय साजरा केला. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा अपयशी ठरला. त्याला केवळ एक धाव बनवता आली. परंतु, त्याचे हे अपयश मागील दोन हंगामापासून स्पष्ट दिसून येत आहे.
सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने 10 चेंडू खेळले. यादरम्यान त्याला एक जीवदानही मिळाले. मात्र, तो या जीवनाचा फायदा घेऊ शकला नाही व एका धावेवर तंबूत परतला. हंगामाची सुरुवात त्याच्यासाठी व संघासाठी यामुळे खराब झाली.
मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. 2020 मध्ये मुंबईने आपले अखेरचे विजेतेपद पटकावलेले. त्यानंतर दोन वर्ष मुंबईला प्ले ऑफमध्ये देखील पात्रता मिळवता आली नाही. संघाच्या या अपयशाचे सर्वात मोठे कारण कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म देखील राहिले आहे.
रोहितने आयपीएलमध्ये खेळलेल्या अखेरच्या 15 सामन्यांमध्ये 269 धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी केवळ 17.93 व स्ट्राईक रेट 115 इतका साधारण राहिला आहे. विशेष म्हणजे यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. रोहितची 2021 हंगामातील कामगिरी देखील तितकी चांगली नव्हती. त्याने त्या हंगामात 13 सामन्यात 381 धावा केल्या होत्या. त्यातही केवळ एकच अर्धशतक समाविष्ट होते.
रोहितला मागील दोन हंगामातील हे अपयश भरून काढावे लागेल. कारण, मुंबईला आपले सहावे विजेतेपद मिळवायचे असेल तर रोहितला फॉर्म मध्ये यावे लागणार आहे.
(Rohit Sharma Last Two Season Poor With Bat In IPL 2023 For Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार वर्षांनंतर चेपॉकवर उडाला टॉस! लखनऊचा गोलंदाजीचा निर्णय, सीएसके करणार फलंदाजी
विजयानंतरही आरसीबीचे वाढले टेन्शन! टोप्लीच्या दुखापतीने गोलंदाजी आक्रमण लंगडे? दुखापतग्रस्तांची वाढली यादी