भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवार 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना आहे. या सामन्यात तुम्हाला भारताच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये उलथापालथ झालेली दिसू शकते.
रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंतच्या तीन सामन्यांत सलामी देणाऱ्या राहुल-यशस्वीची जोडी चौथ्या कसोटी सामन्यात तुटण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही खेळाडूला वगळलं जाणार नाही. वास्तविक, केएल राहुलचा फलंदाजी क्रम पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा राहुलच्या जागी सलामीला येऊ शकतो.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी बातम्या येत आहेत की, कर्णधार रोहित शर्मा पुन्हा यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित सहाव्या क्रमांकावर खेळला होता. पहिल्या तीन सामन्यात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली होती. राहुलनं दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर यशस्वीनंही एका डावात शतक ठोकलं आहे. मात्र दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मासाठी तीन डाव अतिशय खराब राहिले आहेत. अशा स्थितीत तो पुन्हा डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
आता प्रश्न असा आहे की, जर रोहित शर्मा सलामीला आला तर केएल राहुल कोणत्या क्रमांकावर खेळेल? या परिस्थितीत राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो, तर शुबमन गिलला सहाव्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं. विदेशी मैदानांवर गिल तिसऱ्या क्रमांकावर तितका प्रभावी दिसलेला नाही. अशा स्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास त्याला जुन्या चेंडूनं थोडा वेळ मिळू शकतो.
विराट कोहलीची चौथ्या क्रमांकावर जागा पक्की आहे. तर रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळेल. एमसीजीची खेळपट्टी पाहता नितीश कुमार रेड्डीच्या जागी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. अशाप्रकारे भारत या सामन्यात जडेजा आणि सुंदर या दोन फिरकीपटूंसह उतरेल.
हेही वाचा –
संघाला धक्का! दिग्गज फिरकीपटू बॉक्सिंग डे कसोटीमधून बाहेर, कारण जाणून घ्या
मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन घोषित, घातक खेळाडूचं पदार्पण
सिराजला डच्चू! दोन फिरकीपटूंसह उतरणार टीम इंडिया? बॉक्सिंग डे कसोटीत अशी असेल भारताची प्लेइंग 11