भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर (22 नोव्हेंबर) रोजी भिडणार आहेत. पण भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. या बातमीद्वारे आपण भारतीय कर्णधार रोहित शर्मा बाॅर्डर-गावसकर मालिकेत कधी पुनरागमन करेल याविषयी जाणून घेऊया.
विराट कोहलीसह (Virat Kohli) जवळपास सर्वच खेळाडू पर्थला पोहोचले आहेत. पण रोहित भारतीय संघासोबत गेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार रोहित पर्थ कसोटीत खेळणार नाही. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी रोहितशी चर्चा केली आहे. रोहित म्हणाला की, त्याला आणखी काही काळ कुटुंबासोबत राहायचे आहे. यामुळे तो पर्थ कसोटीत खेळणार नाही.
रोहित पर्थ कसोटीत खेळणार नाही. पण यानंतर तो पुनरागमन करू शकतो. रिपोर्टनुसार तो कसोटीसाठी ॲडलेडला पोहोचेल. भारत-ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्येच खेळला जाणार आहे. हा सामना (6 डिसेंबर) पासून होणार आहे.
खरेतर, रोहितची पत्नी रितिकाने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) मुलाला जन्म दिला. रोहित दुसऱ्यांदा वडील झाला. याबाबत रोहितने शनिवारी पोस्ट शेअर करून सर्वांना माहिती दिली. या कारणास्तव तो अजूनही आपल्या कुटुंबासोबत आहे. भारतीय संघ पर्थ कसोटीसाठी तयारी करत आहे. यादरम्यान संघाला मोठा धक्का बसला. शुबमन गिल (Shubman Gill) सरावादरम्यान जखमी झाला. (22 नोव्हेंबर) पूर्वी तो तंदुरुस्त झाला नाही, तर तो पर्थ कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2013 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 64 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 111 डावात फलंदाजी करताना त्याने 42.27च्या सरासरीने 4,270 धावा कुटल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 57.48 राहिला आहे. कसोटीमध्ये त्याने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलावासाठी आरसीबीच्या सर्व योजना तयार! प्रशिक्षक बनवणार मजबूत संघ
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी माजी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचा गौतम गंभीरवर शाब्दिक हल्ला!
चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात येणार! आयसीसीनं जारी केलं वेळापत्रक