---Advertisement---

रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?

Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा 30 एप्रिलला त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तुम्हाला माहित आहे का की, टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची संपत्ती आणि मालमत्ता किती आहे? नसेल माहित तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला रोहित शर्माच्या एकूण संपत्तीबद्दल इत्यंभूत माहिती देणार आहोत.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती 214 कोटी रुपये आहे. पगार आणि मॅच फी व्यतिरिक्त रोहित आयपीएल आणि जाहिरातींमधूनही कोट्यावधी रुपये कमावतो. बीसीसीआयनं रोहित शर्माला वार्षिक कराराच्या A+ ग्रेड श्रेणीत ठेवलं आहे. ज्याद्वारे रोहित शर्माला बीसीसीआयकडून वर्षाला अंदाजे 7 कोटी रुपये मिळतात.

याशिवाय रोहित शर्माला एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. तर एक वनडे खेळण्यासाठी त्याला 6 लाख रुपये मिळतात. तसेच रोहित शर्माला एक टी-20 सामना खेळण्यासाठी सुमारे 3 लाख रुपये मिळतात.

रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतो. मुंबई इंडियन्स सोबत रोहित शर्माचा वार्षिक 16 कोटी रुपयांचा करार आहे. याशिवाय रोहित शर्मानं आयपीएलमधून आतापर्यंत अंदाजे 178 कोटी रुपये कमावले आहेत.

खेळाव्यतिरिक्त रोहित शर्मा अनेक मोठ्या ब्रँडशी जोडला गेला आहे. या ब्रँड्सच्या जाहिरातींमार्फत आणि सोशल मीडियावरून देखील तो कोट्यावधी रुपये कमावतो. एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपयांची फी घेतो.

रोहित शर्माची मुंबईत ‘क्रिक किंगडम’ नावाची स्वतःची क्रिकेट अकादमी आहे. ही अकादमी जगभरातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना शोधण्याचं काम करते. याद्वारे देखील रोहित शर्माला उत्पन्न मिळतं. याशिवाय रोहित शर्मानं अनेक ब्रँड्समध्ये गुंतवणूक केली आहे. अशाप्रकारे टीम इंडियाचा हा ‘हिटमॅन’ कोट्यावधी रुपयांचा धनी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या काय आहे खासियत

ऋतुराज गायकवाडची दुखापत चेन्नईचं संकट वाढवणार? आयपीएल 2024 मधून बाहेर होणार का सीएसकेचा कर्णधार?

3 असे खेळाडू ज्यांचा प्रथमच टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होऊ शकतो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---