राजकोटमध्ये भारत आणि बांगलादेश संघात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात तिसऱ्या पंचाकडून एक चूक झाली. पंचाकडून झालेल्या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्मा पंचावर भडकला. इतकेच नव्हे तर रोहित शर्माने पंचा बद्दल अपशब्द वापरले. आणि मैदानात असलेल्या कॅमरा मध्ये कैद झाले.
झाले असे की युजवेंद्र चहल 13 वे षटक टाकत होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंतने सौम्य सरकारला स्टंप आउट केले. पण रिषभने योग्य स्टंपआऊट केले की नाही हे तपासण्यासाठी मैदानातील पंचांनी तिसर्या पंचाची मदत घेतली.
तिसर्या पंचांनी तपासणी केली. या तपासणीनंतर सरकारला बाद असल्याचे सिद्ध झाले. तिसरे पंच अनिल चौधरी यांनी मोठ्या स्क्रीनवर निर्णय देताना सरकारला नाबाद दिले. तथापि, लगेचच चूक लक्षात आल्याने त्यांनी ती मान्य करून काही सेकंदात निकाल बदलला आणि सरकारला बाद दिले.
परंतु मोठ्या पडद्यावर पंचांनी पहिल्यांदा नाबाद दिलेले पाहून रोहित शर्माने तिसर्या पंचाला शिवीगाळ केली.
त्याच्या या कृतीबद्दल सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘मी मैदानावर खूप भावनिक व्यक्ती आहे. या सामन्याचे काही निकाल आणि मागील सामन्याचे काही निकाल मोठ्या स्क्रीनवर पाहणे आमच्यासाठी निराशाजनक होते. अशा परिस्थितीत आपल्या भावना कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्त होतात. पुढच्या वेळी मी कॅमेरा कुठे आहे हे लक्षात ठेवेल.
राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळलेला हा दुसरा टी२० सामना भारताने ८ विकेट्सने जिंकला. भारताच्या या विजयात रोहित शर्माने 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 85 धावा करत महत्त्वाचा वाटा उचलला. रोहित शर्माचा हा 100 वा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना होता.
विश्वचषकानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगलेल्या सामन्यात इंग्लंडची न्यूझीलंडवर मात
वाचा👉https://t.co/pE8GgZiG0k👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #NZvsENG #SuperOver
— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
हे आहेत भारताकडून पहिले १०० कसोटी, वनडे आणि टी२० सामने खेळणारे खेळाडू. वाचा 👉 https://t.co/cWYZTUzJZO 👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi
— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019