---Advertisement---

क्या बात! सलग आठ टी20 विश्वचषकात टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ एकमेव खेळाडू

On: सोमवार, सप्टेंबर 12, 2022 8:14 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्त्व मुंबईकर रोहित शर्मा करणार असून, उपकर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. (team India for t20 world cup) आशिया कपमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे संघात काही बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आठव्यांदा होत असलेल्या टी20 विश्वचषकात सहभागी होणारा रोहित शर्मा हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवडसमितीने संघाची घोषणा करताना रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली. रोहित हा टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारा केवळ तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी केवळ एमएस धोनी व विराट कोहलीने विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते.

रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव क्रिकेटपटू आहे जो सर्वच्या सर्व टी20 विश्वचषकात खेळेल. रोहितने 2007 टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डरबन येथे पदार्पण केलेले. त्यानंतरच्या 2009, 2010, 2012, 2014, 2016 ते मागील वर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे झालेल्या विश्वचषकातही खेळला होता.

रोहित शर्माने आतापर्यंत 7 विश्वचषकात खेळताना 33 सामन्यांच्या 30 डावात 38.50 च्या सरासरीने व 131.52 च्या स्ट्राईक रेटने 847 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आठ अर्धशतके ठोकलीत.

रोहितच्या आजवरच्या टी20 कारकिर्दीचा विचार केला गेल्यास तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 136 सामन्यात 32.32 च्या सरासरीने व 140 च्या स्ट्राईक रेटने 3620 धावा काढल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.

टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीड वर्षांपूर्वी नैराश्यात गेलेला दीपक आता वर्ल्डकपला निघालाय
यावर्षीचा टी-20 विश्वचषक युझवेंद्र चहल खेळणारच! बीसीसीआयने जाहीर केला संघ
पुन्हा एकदा बजबॉल ठरले यशस्वी! तीन दिवसांत इंग्लंडने आफ्रिकेला पराभूत करत मालिका टाकली खिशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---