भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सिडनीत खेळला जाणारा आहे. मात्र या कसोटीपूर्व भारतीय संघाबाबत मोठं वृत्त समोर आलं आहे. वृत्तानुसार, 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कसोटीतून कर्णधार रोहित शर्मानं स्वतः आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करेल. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतानं पर्थ कसोटीत विजय मिळवला होता.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, रोहित शर्मानं स्वतः पाचव्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यानं हा निर्णय भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना कळवला, जे सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी ही रोहितनं भारतासाठी खेळलेली शेवटची कसोटी असू शकते, कारण तो पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या योजनेत नसेल. त्याच वेळी, भारत WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत रोहितसाठी सिडनी कसोटी ही शेवटची संधी होती. मात्र आता त्यानं स्वतःहून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहनं पर्थ कसोटीत भारताची कमान सांभाळली होती. त्यानं या सामन्यात शानदार नेतृत्व करत स्वतः गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली होती. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतानं 295 धावांनी विजय मिळवला होता पण त्यानंतर रोहित परतला आणि तेव्हापासून भारत विजयासाठी आसुसला आहे.
ब्रिस्बेनमध्ये पावसामुळे सामना अनिर्णित राहिला, तर ऑस्ट्रेलियानं ॲडलेड आणि मेलबर्नमध्ये मोठे विजय नोंदवले. यामुळे भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. जर टीम इंडियाला सिडनीमध्येही पराभवाचा सामना करावा लागला तर संघ मालिका गमावेल आणि डब्ल्यूटीसी फायनलच्या आशांनाही मोठा फटका बसेल. अशा स्थितीत बुमराहला त्याच्या नेतृत्वाखाली भारताला विजय मिळवून देणं आवश्यक आहे.
हेही वाचा –
खेलरत्न पुरस्कार जिंकलेल्या खेळाडूंना मिळेल बंपर बक्षीस, रक्कम जाणून बसेल धक्का!
मेजर ध्यानचंद ‘खेलरत्न’ पुरस्काराची घोषणा; गुकेश, मनू भाकरसह या 4 खेळाडूंना मिळाला सर्वोच्च सन्मान
सिडनी कसोटीत आकाश दीपच्या जागी कोण खेळणार? हे 3 खेळाडू शर्यतीत