कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय संघाने मार्चनंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. यादरम्यान बऱ्याच भारतीय खेळाडूंना भरपूर वेळ मिळाला. त्यानंतर आता आयपीएलमार्फत सर्वच क्रिकेटपटू आपापल्या फ्रंचायझी संघाकडून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार आहेत. यादरम्यान अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विटरवर #AskRo सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान त्याने संघसहकारी सुरेश रैनाच्या त्या कमेंटवरही प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये रैनाने म्हटले होते की, तो रोहितला भारताचा पुढील एमएस धोनी मानतो.
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, तर आपल्या नेतृत्वात त्याने भारतीय संघाला निदाहास ट्रॉफी आणि आशिया चषकात विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वाची प्रशंसा अनेक दिग्गजांनी केली आहे.
रैनाने म्हटले होते की, “मला असे वाटते की रोहितच भारतीय संघाचा पुढील एमएस धोनी आहे. मी त्याला पाहिले आहे, तो शांत आहे. त्याला इतरांचे ऐकून घ्यायला आवडते तसेच तो पुढे येऊन नेतृत्वही करतो.”
#AskRo सेशन मध्ये एका चाहत्याने रोहितला विचारले की, “अलीकडेच रैनाने तुमची तुलना धोनीशी केली होती, आपल्या कर्णधारपदाचा सर्वात महत्वाचा घटक कोणता आणि बाकीच्या कर्णधारांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात हे सांगू शकता का?”
यावर रोहितने उत्तर देत म्हटले की, “होय, मी सुरेश रैनाच्या या कमेंटबद्दल ऐकले आहे. धोनी वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे आणि इतर कोणीही त्याच्यासारखा होऊ शकत नाही. माझा असा विश्वास आहे की अशाप्रकारची तुलना झाली नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे आणि त्याची मजबूती आणि कमजोरी वेगवेगळी असते.”
Q: Will we see a six-hitting competition between @hardikpandya7, @KieronPollard55, @lynny50 and you?#AskRo @ImRo45
– @mipaltan— Rohit Sharma (@ImRo45) August 2, 2020
धोनीच्या नेतृत्वात आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलचे ३ विजेतेपद जिंकले आहेत. याव्यतिरिक्त धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. त्याचबरोबर तो जगातील एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात देशाने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-जेव्हा क्रिकेटपटूंनी भरलेले जहाज भयानक तूफानामुळे बुडाले, झाला होता अनेक क्रिकेटर्सचा मृत्यू
-माजी गोलंदाज म्हणतोय, डीआरएस आधी असतं तर कधीच १० विकेट्स घेतल्या असत्या
-नताशाने मुलाला जन्म दिल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडकडून मिळाली अशी प्रतिक्रिया…
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात हे ५ दिग्गज विदेशी खेळाडू दिसणार नाहीत, संघांचे टेन्शन वाढले
-हे ५ खेळाडू जिंकू शकतात आयपीएल २०२० ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार
-४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने