---Advertisement---

दिल्लीच्या पठ्ठ्यांनी महाराष्ट्राच्या गड्यावर केला शॅम्पेनचा वर्षांव, भारताचा विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, जुलै 18, 2022 3:44 PM
Team India Celebration
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या धमाकेदार खेळीने भारताने इंग्लडचा त्यांच्यात घरात पराभव केला आहे. मॅनचेस्टर, ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या या मालिका निर्णायक तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने यजमानांचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद भारताच्या खेळाडूंनीही मोठ्या जल्लोषात केला आहे. यावेळी पंत आणि शिखर धवन यांनी रोहित शर्मावर शॅम्पेनचा वर्षाव केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वनडे मालिका १-१ अशी असताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४५.५ षटकात सर्वबाद २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने पहिल्या चार विकेट्स अवघ्या ७२ धावांवर गमावल्या होत्या. अशा स्थितीत रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) धोकादायक फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी ११५ चेंडूत १३३ धावांची भागीदारी केली.

सामनावीर रिषभ पंत

पंतने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक केले. त्याने या सामन्यात ११३ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद १२५ धावा केल्या. २०१८मध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूला पहिले शतक करण्यासाठी २६ सामन्यांची वाट पाहावी लागली. संघाची अवस्था बिकट असताना त्याने हार्दिकसोबत शतकीय भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू हार्दिक सर्वोत्तम

इंग्लंडच्या विरुद्ध हार्दिकने नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाजी इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्येच केली आहे. या सामन्यात त्याने गोलंदाजीत ७ षटके टाकताना २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजीवेळी ५५ चेंडूत १० चौकार मारत ७१ धावा केल्या. याआधी त्याने झालेल्या टी२० मालिकेत एकाच सामन्यात ४ विकेट्स घेत अर्धशतकही केले होते. त्याने २०१८च्या ऩॉटींघम कसोटी सामन्यात २८ धावा देत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

भारताने २०१९च्या विश्वचषकाचा उपांत्यफेरीचा सामना याच मैदानावर गमावला आहे. इंग्लंडला त्यांच्यात घरात पराभूत करणारा रोहित तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

संघ ठरले आता ठिकाण अन् वेळही निश्चित! वाचा भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

मागच्या आठ वर्षात इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा भारत दुसरा संघ, जाणून घ्या सर्व रेकॉर्ड्स

हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---