भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणारा पहिला टी20 सामना मोहाली येथे 20 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. विश्वचषकापूर्वी या मालिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मालिकेआधीच्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. मात्र, याच पत्रकार परिषदेत बोलताना त्याने एका पत्रकाराला मजेदार उत्तर देत संपूर्ण सभागृहात हशा पिकवला.
रोहितने भारतीय संघ, अर्शदीप सिंग, विराट कोहली इत्यादी अनेक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका पत्रकाराने त्याला चांगलाच लांबलच प्रश्न विचारला. त्या पत्रकाराने आधी बराच वेळ घालवला आणि नंतर भारताची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा रोहितने डोक्यावरील टोपी काढून पुन्हा डोक्यावर ठेवत ‘इतना लंबा सवाल पूछते हो’ असे शब्द पुटपुटले. त्यावर सर्व उपस्थित हसायला लागले.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1571523771005284352?s=20&t=6vLe6H4dIv7wfUfxlGnVcg
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची मालिका 20, 22 व 25 सप्टेंबर रोजी खेळली जाईल. हे तिन्ही सामने अनुक्रमे मोहाली, नागपूर व हैदराबाद या ठिकाणी खेळवले जातील. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ खेळेल. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला या सहा सामन्यांमधून तयारीची पुरेशी संधी मिळेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ क्रिकेट-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय