IND vs AFG 2nd T20I: अफगाणिस्तान विरूद्ध झालेल्या दूसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा शून्यावरच बाद झाला. तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित झाला. अफगाणच्या फजल फारूकीने त्याची विकेट घेतली. मालिकेच्या पहिल्या सामन्यातही तो शून्यावरच बाद झाला होता.
कूणालाही नको असलेला रेकॉर्ड होणार रोहितच्या नावावर
बॅक टू बॅक सामन्यांत झिरो वर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा(Rohit Sharma) एका नको असलेल्या विक्रमाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा हा विक्रम आहे. रोहित दूसऱ्या टी-20 सामन्यानंतर एकूण 12 वेळा शून्यावर बाद झाला आहे. पहिल्या क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग(Paul Stirling) हा आहे. तो एकूण 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे. आपल्या विक्रमी 150 व्या टी-20 सामन्यात रोहित आणखी एका विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. (On record 150th T20I, Rohit Sharma becomes joint-second with most golden ducks)
14 महिन्यानंतर करतोय कमबॅक
रोहित तब्बल 14 महिन्यानंतर टी-20 क्रिकेट(T20 Internationals) मध्ये पुनरागमन करतोय. अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेतून त्याने टी-20 संघात पुनरागमन केली आहे. 2022 टी-20 विश्वचषकानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मधून ब्रेक घेतला होता. विराट कोहली(Virat Kohli) आणि रोहितला यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर नजर ठेवत पुन्हा संघात घेण्यात आले आहे.
खेळलाय विक्रमी 150 सामने
अफगाणिस्तानविरूद्धच्या दूसऱ्या सामना रोहितचा 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. तो अशी कामगिरी करणारा पहिला पुरूष क्रिकेटपटू बनला आहे. त्याने 150 सामन्यांत 30.82 च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. यात 4 शतक आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक
आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; डीन एल्गरला घ्यायची नव्हती निवृत्ती, प्रशिक्षकामुळे घ्यावा लागला निर्णय