भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान दिले आहे. भारताला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात रिषभ पंत याचा मोठा वाटा राहिला. त्याने या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा करत भलेभले विक्रम मोडले. मात्र रोहित शर्मा याच्या अव्वलस्थानाला तोदेखील धक्का लावू शकला नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत (Five Matches Test Series) सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. या यादीत रोहित (Rohit Sharma) अव्वलस्थानी आहे. तो या मालिकेतील पहिल्या ४ सामन्यात उपस्थित होता. मात्र पाचव्या आणि अखेरच्या सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे तो हा सामना खेळू शकला नाही. तरीही भारताकडून या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तोच अव्वलस्थानी कायम आहे.
रोहितने इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत ५२.५७ च्या सरासरीने सर्वाधिक ३६८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे १ शतक आणि २ अर्धशतके यांचाही समावेश आहे. रोहितच्या प्रथमस्थानाला गाठण्यासाठी पंतने थोडी टक्कर दिली, परंतु १९ धावांनी तो मागे पडला. पंतने (Rishabh Pant) पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १४६ धावा आणि दुसऱ्या डावात ५७ धावांची खेळी केली. या खेळींच्या जोरावर त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३४९ धावांची आपल्या नावापुढे नोंद केली.
तसेच पाचव्या कसोटी सामन्याचा भाग नसलेला सलामीवीर केएल राहुल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पहिल्या ४ सामन्यात मिळून इंग्लंडविरुद्ध ३१५ धावा फटकावल्या आहेत. तर चेतेश्वर पुजारा ३०६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडविरुद्ध चालू कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा-
३६८ धावा: रोहित शर्मा
३४९ धावा: रिषभ पंत
३१५ धावा: केएल राहुल
३०६ धावा: चेतेश्वर पुजारा
२८७ धावा: रविंद्र जडेजा
२४९ धावा: विराट कोहली
१२५ धावा: जसप्रीत बुमराह
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
समालोचन करताना सेहवागने कोहलीला म्हटले चक्क ‘छमिया’, सोशल मीडियावर चाहते घेतायत शाळा़
शतकानंतर अर्धशतक, रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध जाळ अन् धूर संगठच काढला; थेट अव्वलस्थानी पोहोचला
धोनीनंतर भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक बनत चाललाय पंत..! खास यादीत माहीसोबत नोंदवलंय नाव