भारतीय क्रिकेट संघ रविवारी (२४ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी आयसीसीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रोहित शर्माने २००७ च्या विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आयसीसीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा २००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या चेंडूवर झालेल्या किस्स्याबद्दल म्हणाला, “मी कव्हरमध्ये उभा होतो. जोगिंदर शर्मा गोलंदाजी करत होता. मला आठवते युवराज पॉइंटवर उभा होता. मिसबाहने तो शॉट खेळला तेव्हा मला युवराज आणि श्रीशांत दोघे दिसत होते. तो शॉट पाहून युवराज स्तब्ध झाला, त्याला तो झेल बघायचा नव्हता. कदाचीत श्रीशांत हा झेल सोडेल, असे त्याला वाटत होते. त्याच्या मनात काय चालले आहे ते मला माहित नव्हते.”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘हा माझा पहिला विश्वचषक होता. चषक जिंकल्यावर काय वाटेल याची मला मुळीच कल्पना नव्हती. मी फक्त प्रार्थना करत होतो की श्रीसंतने तो झेल घ्यावा. सुदैवाने श्रीसंतला जास्त हालचाल करावी लागली नाही आणि त्याने तो झेल घेतला.’
https://www.instagram.com/reel/CVWxlihl1Dd
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. ज्यात गौतम गंभीरने ७५ धावांचे योगदान दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक वगळता अन्य कोणीही खेळपट्टीवर टिकू शकले नाही. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माच्या शेवटच्या षटकात श्रीसंतने मिसबाह-उल-हकचा झेल घेतल्यानंतर पाकिस्तान संघाला पराभव पत्करावा लागला होता.
यासह भारत टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला होता. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाक सामन्याची उत्सुकता शिगेला! रेस्टोरंट, बारसह चहाच्या स्टॉलवरही चाहत्यांना मिळणार सूट
भारत- पाकिस्तान सामन्यावर लागला ‘इतक्या’ कोटींचा सट्टा, आकडा वाचून सरकेल पायाखालची जमीन
वर्ल्डकपसाठी येण्यापूर्वी बाबरला काय म्हणाले पाकिस्तानी पंतप्रधान? स्वतः केला खुलासा






