सध्या टिव्ही आणि मोबाईलचा जमाना आहे. राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करतात. अगदी क्रिकेटपटूही याला अपवाद नाहीत. क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेलेले असतात. एखाद्या संघ सहकाऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, एखाद्या क्रिकेटरच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करणे, कौटुंबियांचे फोटो किंवा इतर पोस्ट करण्यापर्यंत क्रिकेटपटू सोशल मीडियाचा वापर करत असतात.
भारताचा वेगवान गोलंदाज धवन कुलकर्णी (Dhawal Kulkarni) यानेही मंगळवार रोजी(०१ फेब्रुवारी) त्याच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट केली आहे. परंतु त्याच्या पोस्टपेक्षा जास्त त्यावर भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दिलेली प्रतिक्रिया अधिक चर्चेत (Rohit Comment On Dhawal Post) आली आहे.
मुंबईकर धवलने त्याच्या काही मित्रांसोबत कॅफेमध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेतानाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोमध्ये तो त्याच्या २ मित्रांसोबत कॉफी पिताना कशाचा तरी विचार करताना दिसतो आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘आमच्यात कशाबद्दल चर्चा चालली असेल? काही अंदाज?’, असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CZbBsqqNJC_/?utm_source=ig_web_copy_link
धवलच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळे अंदाज बांधत प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. याच यादीत रोहितनेही धवलच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुमच्यामध्ये कोण सर्वात मोठा झ….डा आहे, याबद्दल चर्चा चालू आहे’, असे लिहिले आहे.
हेही वाचा- दुसऱ्या ‘कपिल देव’च्या शोधावर गौतम गंभीरकडून नाराजी व्यक्त, नव्या अष्टपैलूविषयी केले मोठे भाष्य
रोहितसारख्या नामवंत क्रिकेटपटूने अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्याचे पाहून चाहते मात्र थक्क झाले आहेत. त्याच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना रोहित भाऊ तूही? असे लिहिले आहे. तर एका चाहत्याने लिहिले आहे की, पोस्ट भलेही धवलची असेल, पण चर्चा फक्त हिटमॅनची आहे. फक्त दिग्गजांना त्याचे उत्तर माहिती आहे.
तसेच एका चाहत्याने क्रिकेटच्या भाषेत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. रोहित शर्माने उत्तुंग असा शाब्दिक षटकार मारला आहे, अभिनंदन सर, असे त्याने लिहिले आहे.
दरम्यान ३३ वर्षीय धवल गेल्या ६ वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु केवळ २ वर्षांसाठी त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १२ वनडे आणि २ टी२० सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या ‘कपिल देव’च्या शोधावर गौतम गंभीरकडून नाराजी व्यक्त, नव्या अष्टपैलूविषयी केले मोठे भाष्य
अखेर भारतातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा लागला मुहूर्त! रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर