भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा मैदानात आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर तो नेहमीच आपल्या मजेशीर स्वभावामुळे चर्चेत असतो. अनेकदा पत्रकार परिषदेत तो मजेशीररित्या उत्तरं देताना दिसून आला आहे. अशातच इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील त्याचा खास अंदाज पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या तुफानी खेळीमुळे भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. रोहित आणि केएल राहुलने मिळून १२६ धावांची भागीदारी केली. तसेच रोहित शर्मा ८३ धावा करून माघारी परतला असून केएल राहुलने १२९ धावांची खेळी केली.
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने रोहितला म्हटले की, “जर भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर, १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणारा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतीयांना विशेष कारण मिळेल.” हे ऐकल्यानंतर रोहित शर्माने सलाम करत म्हटले की, “सलाम आहे सर तुम्हाला, काय म्हटलं आहे तुम्ही.. असे झाले तर हे आमच्यासाठी आणखी बरे होईल..”(Rohit sharma response to the independence day question watch video)
https://twitter.com/CricSubhayan/status/1425980527568310274?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1425980527568310274%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fengland-vs-india-rohit-sharma-response-to-the-independence-day-question-watch-video-81372
रोहित शर्माने केएल राहुल सोबत मिळून १२६ धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीमध्ये त्याने ८३ धावांचे योगदान दिले होते. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार लगावला होता. पहिल्या दिवसखेर भारतीय संघाला ३ बाद २७६ धावा करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! रहाणेचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच चेंडूवर धरली तंबूची वाट, पाहा व्हिडिओ
केरळ सरकारने पीआर श्रीजेशसाठी केली बक्षीसाची घोषणा; इतके कोटी मिळण्याबरोबरच नोकरीतही बढती