---Advertisement---

ICC Ranking । रोहित टॉप 10मध्ये कायम, विराट आणि सिराजलाही फायदा

Rohit Sharma Virat Kohli Mohammad siraj
---Advertisement---

आयसीसीने बुधवारी (26 जुलै) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या ताज्या कसोटी क्रमवारीतही फलंदाजांच्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे 750 गुण आहेत. मागच्या आठवड्यात त्याने सर्वोत्तम 10 फलंदाजांमध्ये स्थान पटकावले होते. त्याव्यतिरिक्त भारताच्या विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनाही कसोटी क्रमवारीत लाभ मिळाला आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 80 आणि 67 धावांची खेळी केली. याच प्रदर्शनाचा फायदा ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) भारतीय कर्णधाराला झाल्याचे दिसते. मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. पण पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे मालिका पाहुण्या संघाने 1-0 अशा अंतराने जिंकली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) याने 211 चेंडूत 212 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. विराटला या खेळीच्या जोरावर 22 गुण मिळवले. सध्या त्याच्याक 733 गुण असून 14व्या क्रमांकावर कायम आहे.

पाकिस्तानच युवा फलंदाज सौद शकील (Saud Shakeel) याला ताज्या क्रमावारीत चांगला फायदा झाला आहे. शकीलने 12 स्थानांची झेप घेत 15वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्याक सध्या 691 गुण आहेत. शकीलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक केले होते. फलंदाजांच्या यादीत केन विलियम्सन (883 गुण) पहिल्या क्रमांकावर कामय आहे. यादीत दुसरा क्रमांक मार्नस लाबुशेन 852 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत तिसरा क्रमांक जो रुट याचा आहे. रुट 852 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ट्रेविस हेड आहे, ज्याच्याकडे 847 गुण आहेत. पाचव्या क्रमाकावर 835 गुणांसह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे.

भारताचा मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने कसोटी गोलंदाजांमध्ये मोठी झेप घेतली आहे. सहा स्थानांच्या फायद्यासह सिराज 33व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याकडे 560 गुण असून ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. सिराजने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्याकसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि स्पिनर अबरार अहमद यांनाही ताज्या क्रमवारीत लाभ मिळाला आहे. भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विनकडे 879 गुण आहेत. (Rohit Sharma retains his No.10 position in the ICC Test Ranking.)

महत्वाच्या बातम्या –
जेमिमाने पुन्हा दाखवले सिंगिंगचे टॅलेंट! भारतीय क्रिकेटपटूचा व्हिडिओ तुफान व्हायरल
अनकॅप्ड भारतीय यष्टीक्षकाचं आयपीएलनंतर देवधर ट्रॉफीत वादळी शतक! सेंट्रल झोनची धावसंख्या 300 पार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---