रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका खूपच आव्हानात्मक राहिली. या दोन फलंदाजांची बॅट या मालिकेत अजिबात चालली नाही, ज्यामुळे टीम इंडियाला मालिका 0-3 अशी गमवावी लागली. मालिकेतील पहिल्या कसोटीत तर संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला होता.
आता विराट आणि रोहितच्या या खराब फॉर्मवर भारताचे दिग्गज खेळाडू आणि माजी मुख्य निवडकर्ते के. श्रीकांत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील 6 डावात 91 धावा करणाऱ्या रोहित शर्माबाबत श्रीकांत यांचं मत आहे की, रोहितनं आता निवृत्ती घ्यायला हवी!
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना श्रीकांत म्हणाले की, जर रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर त्यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला हवी. श्रीकांत म्हणाले, “रोहितनं आधीच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी क्रिकेट सोडल्यानंतर तो केवळ वनडेमध्ये खेळेल. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, रोहितचं वय बरंच झालं आहे. तो आता युवा खेळाडू राहिलेला नाही.”
श्रीकांत यांनी रोहित शिवाय विराट कोहली बाबतही मोठं वक्तव्य केलं. श्रीकांत यांच्या मते, कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेद्वारे कमबॅक करेल. श्रीकांत म्हणाले, “माझ्या मते विराट कोहली ऑस्ट्रेलियात चांगला कमबॅक करेल. त्याला तेथे धावा करणं आवडतं. ती त्याची ताकद आहे. कोहलीनं क्रिकेटला अलविदा करावा, असं म्हणणं खूप घाईचं ठरेल. मी त्याच्या निवृत्तीबाबत विचार करत नाही. त्याच्याकडे आणखी बराच वेळ आहे.”
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडियाला जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी मालिकेतील कमीत कमी 4 सामने जिंकावे लागतील.
हेही वाचा –
IND VS AUS; तिकडे ऑस्ट्रेलियाने BGT साठी तयारी सुरू केली, इकडे भारत मेगा लिलावात व्यस्त
भारतानं 2036 ऑलिम्पिकसाठी ठोकला दावा, गुजरातमधील या शहराला मिळू शकतं यजमानपद
SA VS IND; 6 षटकार आणि विश्वविक्रम, पहिल्याच टी20 मध्ये कर्णधार सूर्याकडे इतिहास रचण्याची संधी!