आयपीएल 2025चा हंगाम खूप रोमांचक पाहायला मिळणार आहे. 2025च्या आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्याची सर्व चाहत्यांना आतुरता लागली आहे. कोणते दिग्गज खेळाडू संघात कायम राहणार तर कोणते खेळाडू मेगा लिलावात उतरणार हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीएल 2025पूर्वी संघ त्यांच्या प्रमुख खेळाडूंना रिटेन करण्याचा प्रयत्न करतील.
तत्पूर्वी मीडिया रिपोर्ट्सनुसार काही खेळाडू असे आहेत जे आयपीएल 2025च्या मेगा लिलावात उतरण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे संघांमध्ये मेगा लिलावात मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 3 खेळाडू आयपीएल 2025च्या मेगा लिलावात उतरु शकतात. हे 3 खेळाडू मेगा लिलावात सहभागी झाले तर लिलावात खूप मोठा रोमांच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
1) रोहित शर्मा (Rohit Sharma)- या यादीत पहिल्यांदा रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव आहे. रोहितनं त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला (MI) 5 वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिलं आहे. परंतु, आयपीएलच्या 17व्या हंगामात मुंबई इंडियन्सनं रोहितला कर्णधार पदावरुन हाटवलं आणि त्याच्याजागी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं की, रोहित मुंबई इंडियन्स सोडणार आणि नव्या संघाचा भाग होणार आहे. जर त्याला मुंबईनं सोडून दिलं तर संघांमध्ये त्याला घेण्यासाठी खूप स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
2) मिचेल स्टार्क (Mitchell Starc)- मिचेल स्टार्क (Mitchell Starc) हा आयपीलच्या शेवटच्या हंगामात सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं संघात सामील केलं होतं. आयपीएलच्या सुरुवाती सामन्यात स्टार्कनं खूपच खराब कामगिरी केली. परंतु प्ले-ऑफच्या सामन्यात स्टार्कनं कोलकातासाठी आक्रमक अंदाजात गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या. स्टार्कनं कोलकातासाठी शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली. परंतु, जर त्याला सोडण्यात आलं तर अनेक संघ त्याला घेण्यासाठी तत्पर असण्याची शक्यता आहे.
3) रिषभ पंत (Rishabh Pant)- पंत हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Captitals) खेळतो. अपघातानंतर बऱ्याच दिवसांनी पंतनं दिल्ली कॅपिटल्स संघात पुनरागमन केलं. शेवटच्या हंगामात पंत दिल्लीसाठी खास कामगिरी करु शकला नाही. त्याच्यावर स्लो-ओव्हर रेटमुळे एका सामन्यात बंदी देखील लावण्यात आली होती. आयपीएल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं की दिल्ली कॅपिटल्स आगामी आयपीएलमध्ये पंतला सोडून देणार आहे. त्यामुळे दिल्लीनं जर पंतला सोडलं तर भारताच्या या डावखुऱ्या फलंदाजाला संघात सामिल करुन घेण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलकीपर श्रीजेशचा मोठा सन्मान! मनू भाकरसोबत मिळाली ही महत्त्वाची जबाबदारी
सुवर्णपदक जिंकताच अर्शदवर पैशांचा पाऊस, पाकिस्तानने जाहीर केले चक्क इतक्या कोटी रकमेचे बक्षीस
“सर आता चॅम्पियन्स ट्राॅफी जिंका” श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय चाहत्यानं केली मागणी