इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्राला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार असून या स्पर्धेचा पहिला सामना पाच वेळा आयपीएल विजेता झालेला मुंबई इंडियन्स आणि पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे समोरासमोर दिसणार आहेत. ही लीग सुरू होण्याच्या अगोदर रोहितची पत्नी रितिका सजदेहने इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती हिटमॅन रोहितसोबत दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना रितिकाने या फोटो खाली हृदयाची इमोजी दिली असून आतापर्यंत 4 लाख 20 हजाराहून अधिक लोकांना हा फोटो आवडला आहे. प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर गौरव कपूर यांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “नमस्कार प्रिय लोकांनो” यावर रितिकाने त्यांना इमोजीच्या माध्यमातून हॅलो देखील म्हटले.
रितिका-रोहितच्या या फोटोला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर आणि शार्दुल ठाकूर यांनी लाईक केले आहे. या फोटोवर चाहत्यांनीही मजेदार टिप्पण्याही दिल्या आहेत. काहींनी रितिकाला समायराबद्दल विचारले असता काही लोकांनी क्रिकेट जगातील सर्वात प्रिय जोडपे असल्याचे सांगितले आहे.
मुंबईचा संघ आपले पहिले पाच सामने चेन्नई येथे खेळणार असल्याचे मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा सोबत रितिका आणि तीची मुलगी समायरा या चेन्नईला गेल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CNHi8MglMoe/?utm_source=ig_web_button_share_sheet
13 डिसेंबर 2015 रोजी रोहित आणि रितिकाचे लग्न झाले होते. तर त्यानंतर 30 डिसेंबर 2018 रोजी रितिकाने एका मुलीला म्हणजेच समायराला जन्म दिला. हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका हे दोघे एका जाहिरातीची शूटींग चालू असताना एकमेकांना भेटले होते. प्रथम रोहितला ती गर्विष्ठ वाटली परंतु नंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. या दोघांच्या भेटण्यात युवराज सिंगची मोलाची भूमिका होती.
रोहितच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल सांगायचे म्हटले, तर त्याने भारतीय संघाकडून 38 कसोटी, 227 एकदिवसीय आणि 111 टी -20 सामने खेळले आहेत. तर त्याने कसोटी सामन्यात 2615, एकदिवसीय सामन्यात 9205 आणि टी-20 सामन्यात 2864 धावा केल्या आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये 200 सामने खेळला असून त्याच्या 200 व्या सामन्यात त्याने मुंबई संघासाठी आयपीएलचे विजेतेपद जिंकवून दिले आहे. मागील आयपीएल हंगामात त्याने आपला आयपीएलचा 200 वा सामना दिल्ली कॅपिटल संघासोबत खेळला आहे. त्याने 200 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 5230 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबा नको ना जाऊ! आयपीएल वारीला निघताना वॉर्नरची लेक गळ्याला पडून ढसाढसा रडली; पाहा तो क्यूट क्षण
भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण
आयपीएल २०२१ मधील राखीव खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन पाहिलीत का? सगळेच आहेत शेरास सव्वाशेर