---Advertisement---

पती नंबर १..! पत्नीच्या बोटांमध्ये वेदना होत असल्याने रोहितने ‘असा’ केला उपचार, पाहा तो प्रेमळ क्षण

---Advertisement---

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा पहिला दिवस भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर झाला. या धुरंधराने पाहुण्या इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप चोपले आणि अफलातून दीडशतकी खेळी केली.

यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह ही स्टेडियममध्ये बसून आपल्या पतीच्या मोठ्या खेळीसाठी प्रार्थना करताना दिसली. परंतु यानंतर तिच्या हाताच्या बोटांमध्ये हलक्याशा वेदना जाणवल्या. यावर रोहित आणि त्याच्या मुलीने मिळून तिचा अतिशय प्रेमळपणे उपचार केला. या गोंडस क्षणाचा फोटो रोहितने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झाले असे की, सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित फलंदाजी करत असताना लवकर बाद होऊ नये म्हणून रितीका फिंगर क्रॉस करुन प्रार्थना करत होती. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित आपल्या कुटूंबासोबत आपल्या खोलीत विश्रांती करण्यासाठी पोहोचला. यावेळी रितीकाने तिच्या हाताची बोटे दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे रोहितने आपली मुलगी समायरासोबत मिळून तिच्या हाताची बोटे चोळली. जेणेकरुन तिला थोडाफार आराम मिळावा.

यावेळचा फोटो ट्विटरवर शेअर करत रोहितने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बोटे व्यवस्थित असल्याचे दिसत आहे. सॅमी (समायरा) आणि मी मिळून आईची (रितीका) वेदनेने भरलेली बोटे चोळत आहोत, म्हणजे तिला थोडेसे बरे वाटेल.’

रोहितचे आपल्या पत्नीप्रति असलेले प्रेम पाहून चाहत्यांनी त्याचा कौतुकांचा वर्षाव केला आहे. रोहित अतिशय प्रेमळ असून तो आपल्या कुटुंबीयांची खूप काळजी घेत असल्याचे म्हणत अनेकांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

https://twitter.com/ImRo45/status/1360607424361549824?s=20

https://twitter.com/Subhash44225501/status/1360638699273289728?s=20

रोहित शर्माची पहिल्या डावातील कामगिरी
रोहितने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात २३१ चेंडूत १६१ धावा केल्या. यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने त्याचे शतक १३० चेंडूत पूर्ण केले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०० धावा फलकावर नोंदवल्या आहेत. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि पदार्पणवीर अक्षर पटेल नाबाद खेळत आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या जोडीवर संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची जबाबदारी, ‘असा’ आहे २० जणांचा संघ

‘उपकर्णधार’ अजिंक्य रहाणेने सांगितले भारतीय फलंदाजांच्या यशाचे गमक, म्हणाला…

श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---