भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात शुक्रवार रोजी (२६ मार्च) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना अतियश रोमांचक ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३६ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांना चोप चोपले. दरम्यान भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताला पहिले यश मिळाले.
त्याचे झाले असे की, इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांनी सुरुवातीच्या षटकात षटकार-चौकारांच्या आतिषबाजीसह संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. सोळाव्या षटकापर्यंत त्यांनी शतकी भागिदारी पूर्ण केली. त्यामुळे त्यांची स्थिरावलेली जोडी तोडण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटू कुलदीप यादवला डावातील १७ वे षटक टाकण्यासाठी पाठवले.
कुलदीपच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बेयरस्टोने खणखणीत षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवर २ धावा घेतल्या. यानंतर बेयरस्टोने तिसरा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. इतक्यात मिड विकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या रोहितने अविश्वसनीय डाइव्ह मारली आणि चेंडू पकडला. यावेळी तोल न सांभाळण्यामुळे तो जमिनीवर कोसळला. परंतु लगेच त्याने स्वत:ला सावरले आणि यष्टीरक्षक पंतच्या दिशेने चेंडू फेकला.
पंतनेही क्षणाचाही विलंब न करता चेंडू यष्टीला लावला. हे सर्व इतक्या लवकर घडले की, धाव घेण्यासाठी फळत असलेले बेयरस्टो आणि जेसन क्रिजच्या अर्ध्यातच राहिले. अशाप्रकारे सहजरित्या रोहित-पंतने मिळून जेसनला धावबाद केले आणि संघाला पहिली विकेट मिळवून दिली.
Follow @ChiragA45 for more videos and edits
— Mr. Critic 2️⃣.0️⃣🎭 (@ChiragA45) March 26, 2021
Cheete ki #chal baj ki #nazar aur @ImRo45 ke fitness pe kabhi sandeh nahi karna kabhibhi mat de sakte hai.. 🐆#RohitSharma #INDvENG #ODI @BCCI pic.twitter.com/q3DzKsa6xh
— Hemant (@Hemantp0073) March 26, 2021
https://twitter.com/AkshayS90334300/status/1375454410566889473?s=20
Just Having Six Packs doesn't mean you are fit 😉.
Ro45-@ImRo45
❤️💙 – #RohitSharma
That's Called Fitness pic.twitter.com/NKsKztb4EF— Swaraj Wankhede 🇮🇳 (@CrickySwaraj) March 26, 2021
What an exceptional piece of fielding by #RohitSharma!
Come on #TeamIndia 👏👏👏👏#INDvENG #INDvsENG #ENGvIND #EngVsInd pic.twitter.com/rlSG53FG11— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) March 26, 2021
रोहितच्या या शानदार क्षेत्ररक्षणाची आणि पंतच्या चपळ यष्टीरक्षणाची सोशल मीडियावर चांगलीच प्रशंसा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर
तीच धावसंख्या तोच फलंदाज! आजवर एक-दोन नव्हे ‘इतक्यांदा’ विराट वनडेत झालाय ६६ धावांवर बाद
राहुलने कोहलीला टाकले मागे, ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज