भारत विरुद्ध इंग्लंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29 वा सामना खेळला गेला. हा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे पार पडला. इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 229 पर्यंत रोखला. भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. त्याचे शतक हुकले असले तरी, रोहितने या सामन्यात पाच मोठे पराक्रम नोंद केले.
भारतीय संघाचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर रोहितने भारताचा डाव सावरला. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने बाद होण्यापूर्वी 101 चेंडूवर 10 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. आपल्या 32 व्या आंतरराष्ट्रीय वनडे शतकापासून तो केवळ 13 धावा दूर राहिला.
रोहितने आपल्या या खेळी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. या विश्वचषकात तो भारतासाठी सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाजही बनला. तसेच या विश्वचषकात त्याने क्लासेनला मागे टाकत सर्वाधिक षटकार देखील ठोकले. यासोबत चालू वर्षात वनडे क्रिकेटमध्ये एक हजार धावा देखील त्याने पूर्ण केल्या.
भारतीय डावाचा विचार केल्यास खराब सुरुवातीनंतर भारताला रोहित व राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करत सामन्यात पुनरागमन करून दिले होते. ते दोघे बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला 229 पर्यंत पोहोचवले.
(Rohit Sharma Set Five Records In 87 Runs Inning Against England)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया