---Advertisement---

अखेर चेन्नईतील साडेसाती संपली! अर्धशतक करताच रोहितने संपवले ‘ते’ दुष्टचक्र

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 11:44 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात शनिवारी (१३ फेब्रुवारी) रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर रोहितने व चेतेश्वर पुजाराने टीम इंडियासाठी ५० धावांची नाबाद भागीदारी केली. याच भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. रोहितच्या याच अर्धशतकाच्या जोरावर त्याने एक दुष्टचक्र संपवलं आहे.

रोहितने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या स्टेडियमवर १० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रोहितला यापुर्वी कधीही येथे अर्धशतक करता आले नव्हते. यापुर्वी ९ आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने चेन्नईला १७च्या सरासरीने १३६ धावा केल्या होत्या. ३६ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. रोहित चेन्नईच्या या स्टेडियमवर धावा करताना कायमच झगडताना दिसला होता. परंतू आज त्याने ही अर्धशतकी खेळी करत त्या नकोशा विक्रमाला मागे टाकले आहे.

पुण्यातील स्टेडियमवरही आहे नकोसा विक्रम
असे असले तरी रोहितसमोर आता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर चांगली खेळी करण्यासाठी दबाव असणार आहे. कारण पुण्यात रोहित ५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याला कधीही अर्धशतक करता आले नाही. पुण्यात रोहितने ५ आंतरराष्ट्रीय सामन्यात १४च्या सरासरीने ७१ धावा केल्या असून ४२ या त्याच्या सर्वोत्तम धावा आहेत.

सलामीवीर म्हणून इंग्लंडविरुद्ध कसोटीत वेगवान अर्धशतक
रोहितने या सामन्यात ४७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. ही त्याची भारतीय सलामीवीराने इंग्लंडविरुद्ध चौथ्या क्रमांकाची वेगवान खेळी आहे. यापुर्वी विरेंद्र सेहवाग (३२ चेंडू), पार्थिव पटेल (३९ चेंडू) व विरेद्र सेहवाग (४५ चेंडू ) यांनी वेगवान अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG 2nd Test Live: पुजारा मागोमाग कोहली स्वस्तात बाद, भारत २२ षटकानंतर ३ बाद ८६ धावांवर

…आणि म्हणून कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला दिली नाही दुसऱ्या कसोटीत संधी

एक असा गुजराती, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं पंखात बळ; आज इंग्लंडविरुद्ध करतोय कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---