वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. भारतीय संघाने अखेरीस विजयासाठी मिळालेल्या 274 धावांचा यशस्वी पाठलाग करताना सलग पाचवा विजय मिळवला. या सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी आत्ता केवळ अर्ध काम झाले असल्याचे म्हटले.
गुणतालिकेत अव्वल स्थानी कोण राहणार या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत पहिल्या स्थानी कब्जा केला. भारताच्या या विजयानंतर प्रतिक्रिया देताना कर्णधार रोहित म्हणाला,
“स्पर्धेची सुरुवात उत्तम झाली आहे. सध्या अर्धे काम पूर्ण झाले असून, अर्धा पल्ला गाठायचा आहे. आम्ही फार दूरचा विचार करत नाही केवळ सध्या असलेला समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत. शमी याला या सामन्यात मिळालेली संधी त्याने दोन्ही हातांनी पकडली. एक वेळ ते 300 च्या पुढे जातील असे वाटत असताना आमच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर गिल आणि मी केवळ संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. विराट जे करत आला आहे तेच त्याने पुन्हा एकदा केले. जडेजाचे योगदान महत्त्वाचे राहिले.”
या सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंड संघाने 274 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडसाठी अनुभवी डेरिल मिचेल याने शानदार शतक झळकावले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतासाठी विराट कोहलीने 95 धावांची खेळी केली. पाच बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सामन्याचा मानकरी ठरला.
(Rohit Sharma Statement After Win Over Newzealand In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
प्रिन्स ऑन टॉप! एकाच वेळी चार मातब्बरांना मागे सोडत केला नवा विक्रम