टी२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आपला पहिला विजय नोंदवला. त्यानंतर शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारताने स्कॉटलंडलाही नमवले. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. दरम्यान, स्कॉटलंडच्या सामन्यापूर्वी आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून भारतीय टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रोहितने अनेक पैलूंवर मोकळेपणाने आपले मत मांडले आहे.
‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहितने सांगितले की, जोपर्यंत तुम्ही विश्वचषक जिंकत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही शतके आणि धावा करा, याला काहीही अर्थ नाही. स्कॉटलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सलामीवीर रोहित शर्मा म्हणाला की, क्रिकेटमध्ये वैयक्तिक प्रतिभेपेक्षा सांघिक कार्य महत्त्वाचे आहे.
रोहित शर्मा म्हणाला की जर त्याच्या संघाने विश्वचषक जिंकला नाही, तर तुम्ही केलेल्या सर्व धावा, सर्व शतके यास काहीही अर्थ नाही. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलशी बोलताना, भारताच्या उपकर्णधाराने म्हटले की, खेळताना सर्वात आधी संघाचा विचार केल्याने माझी कारकीर्द चांगली राहिली आहे.
यावेळी रोहित शर्माने अनेक गोष्टीवर आपले मत मांडले, तो म्हणाला की, ‘२०१६ पासून आजपर्यंत मला खूप अनुभव मिळालेला आहे. २०१६ च्या तुलनेत मी फलंदाज म्हणून खूप परिपक्व झालो आहे. खेळाचे आकलन, संघाला काय हवे आहे. संघाला स्वतःहून पुढे ठेवणे आणि त्यावेळी संघाला काय हवे आहे ते पाहणे. एक किंवा दोन क्षण काढा आणि विचार करा की मी हा शॉट खेळणार आहे का, या क्षणी संघाला त्याची गरज आहे का?’
रोहित फलंदाजीबद्दल बोलताना पुढे म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी सलामीला येता, तेव्हा तुमच्याकडे जास्तीत जास्त चेंडूंचा सामना करण्याची उत्तम संधी असते. तुम्हाला अधिकाधिक धावा करण्याची संधी असते, म्हणूनच तुम्ही पाहत आहात की टी२० मध्ये जगभरातील सर्व संघांच्या पहिल्या तीन फलंदाजांनी धावा केल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करणे हेच माझेही काम आहे.’
सुपर १२ फेरीतील अखेरचा सामना भारत आणि नामिबिया संघात ८ जुलै रोजी रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा कर्णधार विराट १८ नंबरची जर्सी का घालतो? कारण आहे खूपच भावूक