आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने टी२० कर्णधार पदावरून पायउतार करण्याचा निर्णय घेतलेला. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून कमी करण्यात आले आहे. त्याच्याऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला ही जबाबदारी देण्यात आली. मात्र, कर्णधार म्हणून रोहितची मागील कामगिरी कशी आहे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Rohit Sharma New ODI Captain)
कर्णधार म्हणून हिट रोहित
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा याने अनेकदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. डिसेंबर २०१७ पासून दहा वेळा त्याने कर्णधार म्हणून वनडे सामन्यात भारताची धुरा वाहिली होती. या दहापैकी ८ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविले आहेत. तर, दोन सामन्यात पराभवाचे तोंड संघाला पहावे लागले. त्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ८० इतकी आहे. बेन स्टोक्स, पीटर मूर्स व जेपी डुमिनी यांनी कर्णधार म्हणून १०० टक्के विजय मिळवले आहेत. तर, न्यूझीलंडच्या टॉम लॅथम याच्या विजयाची टक्केवारी ८९ टक्के आहे.
टी२० मध्ये अव्वलस्थानी रोहित
टी२० बद्दल बोलायचे झाले तर, २० डिसेंबर २०१७ पासून, रोहितने २२ टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील १८ सामने भारताने जिंकले आहेत. त्याचबरोबर चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. विजयाच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली ८१.८२ टक्के टी२० सामने जिंकले आहेत. या कालावधीत २० किंवा त्याहून अधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा हा कोणत्याही कर्णधाराचा सर्वोत्तम विक्रम आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० टी२० सामने खेळले. यापैकी २४ मध्ये संघाने विजय मिळवला, तर १२ सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त दोन सामने टाय झालेले तर, दोन सामन्यांचे निकाल लागले नव्हते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ६० टक्के टी२० सामने जिंकले. रोहितनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ७३ टक्के सामने जिंकलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या ऍशेस कसोटीत टर्निंग पॉईंट! तिसऱ्या दिवशी रुट-मलान जोडीने आणला सामन्यात रोमांच
Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने टाकला ‘जबडातोड’ बॉल! जीवघेण्या चेंडूपासून थोडक्यात बचावला ट्रेविस हेड
युझवेंद्र चहलच्या पत्नीने केली धोनीच्या ‘हेलीकॉप्टर’ शॉटची नक्कल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल