भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी (9 जानेवारी) सुरू होणार आहे. यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याच्या टी20 कारकिर्दीविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्याने अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. त्यानंतर भारतीय टी20 संघात महत्त्वाचे बदल होणार शक्यता वर्तवली जात आहे. त्याची सुरुवात नुकतीच झाली असून, हार्दिक पंड्या टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. मात्र, त्याला नियमित कर्णधार बनवण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. याच मुद्द्याला धरून रोहित शर्मा याला या पत्रकार परिषदेत त्याच्या टी20 कारकिर्दीविषयी प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना रोहित म्हणाला,
“सलग कोणत्याही प्रकारात सामने खेळणे शक्य नसते. खेळाडूंना आवश्यक ती विश्रांती देणेदेखील गरजेचे असते. टी20 क्रिकेट सोडण्याचा माझा सध्या कोणताही विचार नाही. न्यूझीलंडविरुद्ध आपल्याकडे तीन सामने आहेत. आयपीएलनंतरच याबाबत मी काहीतरी निर्णय घेईल.”
पुढील टी20 विश्वचषक 2024 मध्ये अमेरिका व वेस्ट इंडीज येथे होणार आहे. भारत 2007 टी20 विश्वचषकानंतर अद्याप एकदाही विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही. आगामी विश्वचषकात भारताचा संपूर्ण युवा संघ उतरवण्यात यावा अशी मागणी होताना दिसते. असे झाल्यास रोहित शर्मा, विराट कोहली व केएल राहुल यांना या विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
(Rohit Sharma Talks About His T20 Career And Retirement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॉलेजला गेलो नाही, पण…’, शिक्षण व्यवस्थेविषयी धोनीने स्पष्ट भूमिका
‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम