रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात टी20तील तिसरा सामना (3rd T20 Match) पार पडला. पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 अशी बराबरी केली होती. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता. या सामन्यात भारताने 30 धावांनी (Won by 30 Runs) बांगलादेशच्या संघाला पराभूत केले.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) शेवटच्या षटकामध्ये हॅट्रीक घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. चाहरने या सामन्यात 3.2 षटकात 7 धावा देऊन 6 खेळाडू बाद केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाराही फलंदाज ठरला आहे.
या सामन्यानंतर चाहरने आयएएनएसला सांगितले की, प्रत्येकजण त्याच्या कामगिरीचे कौतुक करत आहे. पण या कामगिरीमागे मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर दाखवलेला विश्वासाचे मोठे योगदान होते.
रोहित म्हणाला की मी तुझा बुमराह सारखा वापर करीन. मी तुला महत्त्वाच्या वेळी गोलंदाजी देईल. यामुळे मला प्रेरणा मिळाली. मला दडपणाखाली जबाबदारी देण्यात येते तेव्हा मला ते आवडते कारण यामुळे मला वाटते की माझावर विश्वास दाखवला जात आहे.’
‘जेव्हा कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा मला वाईट वाटते. कर्णधाराला इतका आत्मविश्वास आला, अश्या नाजूक वळणावर कर्णधाराने इतका विश्वास दाखवला, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, असे चाहरने सांगितले.
असे असले तरी चाहरने बुमराहशी केलेल्या त्याच्या तुलनेचे समर्थन केले नाही. तो म्हणाला, बुमराह अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे यात काही शंका नाही आणि बुमराची माझ्याशी तुलना करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
‘बुमराह कोठे आहे हे मला माहित आहे आणि मला माहित हे देखील माहित आहे की मी कोठे आहे. टी20 मध्ये तो नंबर 1 गोलंदाज आहे. वेग आणि नियंत्रण या दोन गोष्टी त्याच्याकडे आहेत. बुमराह माझ्यासाठी नंबर-1 गोलंदाज आहे आणि मला असे म्हणायला मला लाज वाटत नाही.’
‘मी त्याच्याशी स्पर्धा करीत नाही माझे काम माझा खेळ सुधारणे आहे. आपल्याला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि संघ विजयी झाला पाहिजे अशी भावना ठेवली पाहिजे,’ असे देखील चाहरने म्हटले आहे.
जेव्हा 12 व्या षटकानंतर बांगलादेश आक्रमक फलंदाजी करत होते, तेव्हा मला रोहितकडे जाण्याची इच्छा होती आणि कर्णधाराला सांगायचे होते की मी गोलंदाजी करीन, परंतु कर्णधाराकडे वेगळी रणनीती असल्याने मी असे केले नाही. एक विचार असा होता की आपण सामना गमावू नये. जेव्हा आपण देशाकडून खेळता तेव्हा महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सामना जिंकू इच्छित असतो,’ असे चाहर पुढे म्हणाला.
टीम इंडियाने असे केले संजू सॅमसनच्या बर्थडेचे खास सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
वाचा 👉 https://t.co/uYmb3y2Eql 👈 #म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019
रणवीर सिंगच्या 'नटराज शाॅट'वर कपिल देव म्हणतात…
वाचा- 👉https://t.co/I0sHGEqBus👈#म #मराठी #KapilDev #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019