अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ४४ धावांनी विजय मिळवला. यासह वनडे मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपली पहिलीच मालिका खेळत असलेल्या रोहित शर्माने (Rohit sharma) आतापर्यंत अप्रतिम नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले आहे.
आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २ वनडे सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात रोहित शर्माने एकही चुकीचा निर्णय घेतला नाहीये. त्याने २ सामन्यात ४ वेळेस डीआरएसची मागणी केली आहे आणि चारही वेळेस त्याने पंचांना चुकीचे ठरवले आहे. असाच काहीसा प्रकार दुसऱ्या वनडे सामन्यात देखील पाहायला मिळाला होता. पंचांनी डॅरीन ब्रावोला नाबाद घोषित केले होते. परंतु रोहित शर्माने डीआरएसची मागणी करत पंचांना आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले.
तर झाले असे की, वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी सुरू असताना १० वे षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू डॅरीन ब्रावोच्या बॅटला लागून यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला होता. जोरदार मागणी केल्यानंतर पंचांनी त्याला नाबाद घोषित केले होते. त्यानंतर विचार करून रोहित शर्माने डीआरएसची मागणी केली.
https://twitter.com/jennife74834570/status/1491398367133704192?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1491398367133704192%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Frohit-sharma-took-4th-consecutive-drs-correctly-in-2-odi-against-wi-video-93662
डीआरएसमध्ये स्पष्टपणे दिसून आले की, चेंडू ब्रावोच्या बॅटचा कडा घेत, रिषभ पंतच्या हातात गेला होता. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला आणि पुन्हा एकदा रोहित शर्माचा डीआरएस घेण्याचा निर्णय योग्य ठरला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला अवघ्या १९३ धावा करण्यात यश आले होते. हा सामना भारतीय संघाने ४४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
सनरायझर्स हैदराबादची आघाडी! आयपीएल २०२२ साठी लॉन्च केली जर्सी; सात वर्षांनी केला बदल
माय नेम इज लखन नंतर, आता किंग कोहलीचा श्रीवल्ली डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
विराटला मिळणार डच्चू? ‘या’ खेळाडूंची लागू शकते तिसऱ्या क्रमांकावर वर्णी