सिडनी। भारताला शनिवारी(12 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात 34 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेड येथे होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ ऍडलेडला रवाना झाला आहे. पण त्याआधी एअरपोर्टवर असताना भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा शिखर धवनची लहान मुलगी रिहाकडून फ्लॉस डान्स शिकत होता.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘हिटमॅन फ्लॉस डान्स शिकत आहे. त्याच्याबरोबर केदार जाधवही डान्स शिकत आहे.
Hitman learning the floss dance be like 😅😅#TeamIndia pic.twitter.com/37lGysldJC
— BCCI (@BCCI) January 13, 2019
जाधवचाही एअरपोर्टवरील डान्सचा व्हिडिओ भारतीय संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/Bsjto9ihSCD/
सिडनी वनडे सामन्यासाठी जाधवला भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. तर रोहित शर्माने शतक केले आहे. त्याने या सामन्यात 129 चेंडूत 133 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–त्या एका चेंडूमुळे भारताला सिडनी सामना गमवावा लागला…
–विश्वचषक गाजवलेल्या खेळाडूला मिळाले न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान
–काय सांगता! या संघाने जिंकले १००० सामने…