---Advertisement---

‘रोहित शर्मा नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटपेक्षा जास्त समजदार,’ भारतीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

On: मंगळवार, नोव्हेंबर 24, 2020 4:40 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली चांगला की रोहित शर्मा यावर अनेक दिग्गजांनी आपली मते दिली आहेत. यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज पार्थिव पटेलनेही उडी घेतली असून मोठे वक्तव्य केले आहे. त्याने नेतृत्त्वावर बोलताना म्हटले की, विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा हा जास्त समजदार आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात रोहितबद्दल बोलताना पार्थिवने म्हणाला, “मुद्दा असा आहे की, कोण चांगला निर्णय घेऊ शकतो, कोण चांगल्याप्रकारे खेळ समजू शकतो? दबावात कोण चांगला निर्णय घेईल जो संघाला विजय मिळवून देण्यात मदत करेल? आणि त्याबाबतीत रोहित शर्मा पुढे आहे.”

रोहित शर्मा आहे आयपीएलमधील यशस्वी कर्णधार

भारतीय संघात रोहित उपकर्णधाराची भूमिका निभावतो. परंतु आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करतो. रोहितच्या नेतृत्त्वातच मुंबईने आयपीएलचे ५ विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो मैदानावर प्रत्येक परिस्थितीत शांत असताना दिसतो. त्याच्या या गुणामुळेच तो इतर कर्णधारांपेक्षा वेगळा ठरतो. मुंबईने रोहितच्या नेतृत्त्वात आयपीएलमधील ८ हंगामापैकी ५ हंगामात त्याने आपल्या संघाला विजेतेपद जिंंकून दिले.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा बाहेर पडले आहेत. ज्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा केली होती, तेव्हा रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. दुसरीकडे ईशांतलाही कसोटी संघात सामील केले नव्हते. दोन्ही खेळाडू सध्या बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे आपल्या फिटनेसवर काम करत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, फिटनेस आणि वेळेवर उपलब्ध होऊ शकणार नसल्याने रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा दोघेही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

जुनं ते सोनं! जी जर्सी अंगावर चढवून सचिनने ऑस्ट्रेलियाला चोपले, तीच जर्सी घालणार टीम इंडिया

टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू उतरणार विशेष जर्सीत, कारण आहे खूप खास 

नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---