---Advertisement---

‘काळजी घे, काही लागलं तर बिनधास्त फोन कर’, युवा खेळाडूसाठी रोहितचे मायेचे उद्गार, Video व्हायरल

On: शुक्रवार, मे 27, 2022 9:12 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

आयपीएल २०२२चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी चांगला नव्हता. संघ लीग टप्प्यानंतर शेवटच्या स्थानावर राहिला आणि १४ पैकी १० सामने गमावले. मुंबईच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघ सलग ८ सामने हरला होता. यानंतर लीगच्या उत्तरार्धात ४ सामने जिंकण्यात संघाला यश आले. मात्र, प्लेऑफचे तिकीट मिळविण्यासाठी हे अपुरे ठरले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी आयपीएलचा १५वा हंगामही चांगला गेला नाही. त्याने १४ सामन्यात २६८ धावा केल्या. त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४८ होती. मात्र, रोहितने मन जिंकलं ते मुंबईच्या संघाला बायो बबलमधून अलविदा करताना.

रोहितचा एक व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये रोहित संघाच्या बायो-बबलमधून बाहेर पडल्यानंतर सहकारी खेळाडूंना गुडबाय म्हणत होता. यादरम्यान त्याने युवा खेळाडू रमणदीप सिंगला एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली. रोहित रमणदीप सिंगला सांगत आहे की, “काळजी घे, तुला काही हवे असेल तर मला फोन कर,” असं रोहितने म्हटले आहे. त्याच्या याच वाक्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

रोहितने माझा आत्मविश्वास वाढवला- रमणदीप
याआधी, मुंबईसोबत आयपीएलच्या पदार्पणात ५ सामने खेळलेल्या रमणदीपने रोहित शर्माच्या बोलण्याने त्याचा आत्मविश्वास कसा वाढला हे उघड केले होते. पंजाबच्या या क्रिकेटपटूने आयपीएल २०२२मध्ये ४५ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या, तेव्हा रमणदीप म्हणाला होता, “रोहित भाईने मला सांगितले आहे की, आम्ही तुम्हाला पुढच्या सीझनसाठी तयार करत आहोत. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू जेणेकरून तुम्ही पुढे जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी चांगले काम करू शकाल.”

दरम्यान, हा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून रोहितच्या चाहत्यांसह अनेक क्रिकेटप्रेमींनी रोहितने दाखवलेल्या माणूसकीचे कौतुक केले आहे. खेळानंतरही आपल्या संघातील खेळाडूंची काळजी करणारा कर्णधार रोहित शर्मा असल्याचे मत काही जणांनी व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा-

क्रिकेट विश्वातील दारूडे क्रिकेटर्स, ज्यांनी घातले राडे, टाका एक नजर

जरा इकडे पाहा! आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती?

कोणासोबत न्याय; कोणावर अन्याय? कशी आहे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---