भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार आणि सलामीवर फलंदाज रोहित शर्माने टी२० विश्वचषक २०२० आणि आयपीएल २०२० मध्ये खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. चाहत्यांबरोबर झालेल्या इंस्टाग्राम सेशनमध्ये बोलताना त्याने हे सांगितले. असे असले तरीही कोरोना व्हायरसमुळे सध्याची परिस्थिती पाहता दोन्हीही स्पर्धा संकटात सापडल्या आहेत.
आयपीएल २०२०चे आयोजन २९ मार्च २०२०मध्ये होणार होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे आधी ही स्पर्धा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती आणि सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे, की आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलण्यात येऊ शकते. तसेच, त्यादरम्यान आयपीएल आयोजन केले जाऊ शकते. सध्या तरी याबाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
रोहित शर्माने दिले चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे
इंस्टाग्राम चॅट सेशनदरम्यान चाहत्यांनी रोहितला विचारले, की त्याला टी२० विश्वचषक (T20 World Cup) आणि आयपीएलपैकी (IPL) कोणती स्पर्धा खेळायची आहे?, यावर प्रत्युत्तर देताना रोहितने दोन्हीही स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली. याव्यतिरिक्त रोहितने सांगितले, की ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी चेंडूने दिवस- रात्र कसोटी खेळणेही एकप्रकारे आव्हान असेल.
सध्याच्या वेळापत्रकानुसार भारताला डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यातील दुसरा दिवस- रात्र कसोटी सामना होणार असून तो ऍडलेडमध्ये खेळण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त रोहितने दोन खेळाडूंची नावे सांगितली, ज्यांची फलंदाजी त्याला सर्वाधिक आवडते. त्या खेळाडूंची नावे सांगताना त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडच्या जेसन रॉयचे नाव घेतले.
आता रोहितची दोन्ही स्पर्धांमध्ये खेळण्याची इच्छा पूर्ण होतेय की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टी२० विश्वचषकाबद्दल आयसीसी जुलैमध्ये शेवटचा निर्णय घेऊ शकते. त्यानंतरच बीसीसीआय आयपीएलबद्दल आपला निर्णय जाहीर करू शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतीय क्रिकेट संघाचे ‘हे’ दोन खेळाडू; जे २०२० मध्ये करू शकतात लग्न
-कॉफी विथ करन प्रकरणानंतर असे बदलले केएल राहुलचे आयुष्य
-‘या’ बांगलादेशी कर्णधाराच्या सासूला झाली कोरोनाची लागण