रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (2 जानेवारी) सुरू झाला. विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा याच्या रुपात भारताने पहिली विकेट स्वस्तात गमावली देखील. पहिली विकेट स्वस्तात गेल्यानंतर नेटकरी व्यक्त होत आहेत.
अनेकांच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) मागच्या मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करत नाहीये. अलिकडच्याच काळात रोहितने असे म्हटले होते की, वैयक्तिक विक्रम माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. अनेकांनी असेही म्हटले की, रोहित स्वतःच्या विक्रमांचा विचार न करता संघासाठी निस्वार्थी खेळी करत आला आहे. पण सोशल मीडियावर सध्या त्याच्या सुमार प्रदर्शनाची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित पहिल्या डावात अवघ्या 17 धावा खर्च करून बाद झाला. कर्णधाराने याही सामन्यात स्वस्तात विकेट गमावल्यानंतर सोशल मीडियावर रोहित टिकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.
एका “धावा ओवररेटेड आहेत. त्यामुळे निस्वार्थी रोहितने धावा करणेच सोडून दिले आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “वैयक्तिक विक्रम ओव्हररेटेड आहेत, म्हणून रोहित लवकर बाद झाला आहे.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “कर्णधार म्हणून रोहितचा काळ आता संपला आहे. आता आपण रोहितला मागे सोडून पुढे गोलो पाहिजे.” अजून एक नेटकरी असे लिहितो की, “रोहितची ही निस्वार्थी खेळी आपल्याला नुकसान पोहोचवणारी आहे.”
Runs are overrated , isliye selfless Rohit sharma ne run banana bhi chor Diya
— Niraj K Yadav (@niraj9899ky) February 2, 2024
Personal milestone overrated hai isiliye Rohit Sharma jaldi out hogaya pic.twitter.com/sPpgk7NzK6
— Aryan (@OxygenBholi18) February 2, 2024
Rohit Sharma is finished cricketer. We have to move on from this.#RohitSharma #IndianCricket
— Anup Bhise (@BhiseAnup) February 2, 2024
These “selfless” acts of Rohit Sharma are going to be the end of us
— Ashwin Kumar (@ashwin_kumarV) February 2, 2024
(Rohit Sharma was targeted by netizens after his cheap dismissal in the second Test against England)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । मैदानात पाय टाकताच अँडरसनच्या नावावर मोठा विक्रम, 29 वर्षांनंतर घडला ‘हा’ पराक्रम
राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश संघाला विजेतेपद, पुरूष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघ अव्वल स्थानी