---Advertisement---

रोहित शर्मा वनडेमध्ये खेळणार की नाही? पहा मोठी अपडेट!

On: बुधवार, मे 7, 2025 9:21 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने बुधवारी (7 मे) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Rohit Sharma Retired From Test Cricket) रोहितने त्याच्या इंस्टा स्टोरिद्वारे याची माहिती देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. रोहित आपल्या कसोटी कारकिर्दीत अनेक निर्णायक सामन्यात विजय मिळवले आहेत. पण आता तो पुन्हा कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार नाही.

रोहितने याआधीच 2024चा टी20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली 13 वर्षांनतर टी20 विश्वचषक जिंकला होता. टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली. मग आता रोहित वनडे क्रिकेट खेळणार की नाही? याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.

रोहितने इंस्टावर स्टोरि टाकत लिहले की, “हॅलो! मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्त्व करणे ही अभिमानास्पद गोष्ट होती. तुमचा पाठिंबा आणि दाखवलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. वनडे क्रिकेटमध्ये मी टीम इंडियाकडून खेळत राहिल.” (-रोहित शर्मा (वनडे कर्णधार, टीम इंडिया)

अशाप्रकारे रोहितने आपल्या कसोटीच्या निवृत्तीची घोषणा केली आणि चाहत्यांने दिलेल्या पाठिंब्याचे आभार मानले. त्याने शेवटी सांगितले की, मी वनडे क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.

रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 116 डावात फलंदाजी करताना 40.57च्या सरासरीने 4,301 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 राहिली. कसोटीमध्ये रोहितने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---