भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवारी (22 मार्च) खेळला जाणार आहे. उभय संघांतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघाने प्रत्येक एक विजय मिळवला आहे. अशात तिसरा आणि शेवटचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरेल. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात एक मोठा विक्रम नावावर करू शकतो.
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा एक दिग्गज फलंदाज आहे आणि त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत अनेक मोठ्या मालिका जिंकल्या आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत देखील रोहितच्या नेतृत्वात भारताने विजय मिळवला. उभय संघांतील वनडे मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेतील हा शेवटचा सामना रोहितसाठी खास असेल. कारण रोहित या सामन्यात आशियामध्ये खेळताना आपल्या 10000 धावा पूर्ण करणार आहे. अशी कामगिरी कणारा रोहित शर्मा भारतीय संघाचा 8वा खेळाडू ठरेल.
यापूर्वी भारतीय संघाच्या सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सौरव गांगुली आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी अशी कामगिरी केली होती. रोहित या यादीत बुधवारी नव्याने जोडला जाऊ शकतो. यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनेड सामन्यात अवघ्या 4 धावा कराव्या लागतील.
भारतासाठी आशियामध्ये 10000 धावा करणारे खेळाडू
21741 – सचिन तेंडुलकर
14685 – विराट कोहली,
13497 – राहुल द्रविड
12155 – विरेंद्र सेहवाग
10840 – एमएस धोनी
10709 – सौरव गांगुली
10558 – मोहम्मद अजहरुद्दीन
9996 – रोहित शर्मा*
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा शेवटचा वनडे सामना बुधवारी दुपारी चेन्नईमध्ये खेळला जाईल. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियान संघ 10 विकेट्स राखून जिंकला होता. भारतीय संघ मायदेशातील ही मालिका जिंकण्यासाठी शेवटच्या वनडे सामन्यात पूर्ण प्रयत्न करेल. पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये भारताची भारतीय फलंदाज अपयशी ठरताना दिसले होते. तिसऱ्या वनडे मात्र संघ ही चूक होणार नाही, यासाठी काळजी घेईल.
(Rohit Sharma will make a big record in the third ODI against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निंदनीय! महाराष्ट्राच्या पैलवानाकडून इराणी पैलवानाला चालू कुस्तीत मारहाण, सांगलीत घडली घटना
WPL 2023: मुंबईचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत दिल्ली अव्वलस्थानी, कॅप्सीने पाडला षटकारांचा पाऊस






