रोहित शर्माने एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची धुरा यशस्वीपणे संभाळली होती. त्याने एशिया कप स्पर्धेत तब्बल 105 च्या सरासरीने 317 धावा केल्या होत्या. तरीही त्याला विंडिजविरूद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.
रोहित भारतीय वन-डे संघाचा उपकर्णधार आहे. आगामी विंडिजविरूद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी सराव व्हावा म्हणून रोहित विजय हजारे ट्राॅफीत खेळणार आहे.
विजय हजारे ट्राॅफीतील उपांत्यपुर्व फेरीतील सामने 14 आॅक्टोबरपासून सुरू होणार आहेत. रोहित सरावासाठी या सामन्यांत सहभाग घेणार आहे.
रोहित मुंबई संघासाठी एक किंवा दोन सामने खेळणार आहे. मुंबई संघाचे नेतृत्व मात्र श्रेयस अय्यरकडेच असणार आहे. रोहितच्या समावेशाने मुंबईचा संघ आणखी मजबुत झाला आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी काही दिवसापुर्वी धोनीला देखील घरगुती क्रिकेटमध्ये खेळण्य़ाचा सल्ला दिला होता. धोनीने घरगुती क्रिकेटमध्ये चार दिवसीय सामन्यात भाग घेण्याचा सल्ला गावसकरांनी दिला होता.
महेंद्रसिंग धोनीने चालू वर्षात खेळलेल्या 9 वन-डे सामन्यात फक्त 27 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- ब्रॅडमन यांची सरासरी १०० न होण्याची जबाबदारी घेतली या खेळाडूने
- अर्जून तेंडुलकरचा मुंबईकडून विकेट्सचा धडाका कायम
- तो खास विक्रम करणारा केवळ दुसरा महाराष्ट्रीयन खेळाडू होण्याची रिशांकला आज संधी