आज(16 ऑक्टोबर) भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा 28 वा वाढदिवस आहे. त्याला अनेक क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. शार्दूलचा संघसहकारी रोहित शर्मानेही शार्दूलला त्याची फिरकी घेत शुभेच्छा दिल्या आहे.
शार्दूलने 2017 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. यावेळी त्याने 10 क्रमांकाची जर्सी घातली होती. त्यामुळे त्याला चाहत्यांकडून मोठ्या टीकेला सामोरे जावे लागेल होते.
भारताचा महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरच्या जर्सीचा नंबर 10 होता. त्यामुळे 10 नंबरच्या जर्सीला एक वेगळेच महत्त्व मिळाले आहे. याच कारणामुळे शार्दुलला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
याच जर्सी क्रमांकाची आठवण करुन देत रोहितने शार्दूलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने ट्विट केले आहे की ‘मित्रा वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा. तू ती जर्सी घालणारा केवळ दुसरा खेळाडू आहेस. तो क्रमांक घालण्यासाठी हिम्मत लागते. पण तू अशक्य काहिच नाही, याचे उत्कृष्ट उदाहरण आहेस.’
शार्दूलने अखेर काही दिवसानंतर लगेचच त्याचा जर्सी क्रमांक बदलला होता आणि 54 असा केला होता.
Many happy returns of the day buddy. Only the second player to wear the jersey. It takes guts to don that number but clearly you’re the best example of Impossible Is Nothing 😮😀 @imShard pic.twitter.com/xLovSXSAZG
— Rohit Sharma (@ImRo45) October 16, 2019