वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतल्याचे चित्र पाहायला मिळाले. रोहित शर्माने २०२२च्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात (IND vs WI) ६४ धावा केल्या. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ६ गड्यांच्या बदल्यात १९० धावा केल्या. कर्णधार रोहितने या डावात २ मोठे विक्रम केले आणि २ देशांच्या खेळाडूंना मागे टाकले. तो पुन्हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव सलामीला आले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या. रोहितने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १४५ होता. त्याने ३१व्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या. त्यात ४ शतकांचा समावेश आहे.
कोहली आणि गप्टिल मागे राहिले
रोहित शर्माने आपल्या डावात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल यांना मागे टाकले. रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३४४३ धावा केल्या आहेत आणि तो नंबर-१ वर पोहोचला आहे. त्याने गप्टिलला मागे सोडले. गप्टिलच्या नावावर ३३९९ धावा आहेत. शिवाय, याआधी कोहलीने सर्वाधिक ३० वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, मात्र आता हा विक्रम देखील रोहितने आपल्या नावावर करून घेतला आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या विशेष खेळीच्या जोरावर आणि दिनेश कार्तिकने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे भारताला पहिल्या टी-२० सामन्यात २० षटकात १९० धावा करता आल्या. याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला वेस्ट इंडिज संघ मात्र २० षटकात केवळ १२२ धावा करू शकला. त्यामुळे भारताला पहिल्या सामन्यात तब्बल ६८ धावांनी विजय मिळाला असून सध्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
महत्वाच्या सामन्यापूर्वी विंडीजचा माजी कर्णधार मैदानातच थिरकला, मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल
आधी सिक्स, फोर अन् मग डायरेक्ट घरचा रस्ता! पाहा भारतीय गोलंदाजाचा जोरदार कमबॅक
सूर्याचा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, आगळ्यावेगळ्या फटक्याला पाहून व्हाल अचंबित