भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्या डावात 5 विकेट्स गमावत 151 धावा केल्या आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा हा देखील केवळ 15 धावा करू शकला. यासोबतच आयसीसी नॉक आउट स्पर्धेतील त्याची खराब कामगिरी कायम राहिली.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात रोहितने पहिल्या डावात 26 चेंडूंचा सामना करत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. यावेळी पॅट कमिन्स याच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन रोहितला तंबूचा रस्ता धरावा लागला. मागील सहा आयसीसी नॉक आउट स्पर्धेमध्ये रोहितची ही सलग सहावी खराब कामगिरी ठरली.
रोहितला 2017 चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खाते ही खोलता आले नव्हते. त्यानंतर 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातही न्यूझीलंडविरुद्ध केवळ एक धाव करू शकलेला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या सायकलच्या अंतिम फेरीतही पहिल्या डावात 34 व दुसऱ्या डावात 30 धावा केल्या होत्या. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या टी20 विश्वचषक उपांत्य सामन्यातही त्याला केवळ 27 धावा काढण्यात यश आलेले. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
दुसऱ्या दिवसाचा खेळाबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियन संघाने ट्रेविस हेडचे दीड शतक व स्मिथच्या शतकाच्या जोरावर 467 धावा केल्या. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार बळी मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताचा डाव 5 बाद 151 असा उभा आहे. अजिंक्य रहाणे व भरत हे तिसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
(Rohit Sharma Yet Another Failure In ICC Knock Out Since 2017)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video