वनडेत ३ द्विशतके, टी२०मध्ये सर्वाधिक ४ शतके, मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हटलं की सर्वांच्या तोंडात फक्त एकाच फलंदाजाचे नाव येते, तो म्हणजे रोहित शर्मा. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित हा त्याच्या दमदार फटकेबाजीमुळे हिटमॅन या नावाने ओळखला जातो. त्याच्या फलंदाजी कौशल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत सर्वांमध्ये यश मिळाले आहे.
मात्र, रोहितच्या यशामागे काही वेगळ्याच गोष्टींचा हात आहे, ज्याला अंधविश्वास म्हटले जाते. अनेकांचा यावर विश्वास नसतो, तर अनेक क्रिकेटपटू यावर विश्वास ठेवतात. काही अशा गोष्टी करुन योगायोगाने यशस्वी झाले आहेत तर काही अपयशीही ठरले आहेत. खेळात शेवटी तुम्ही करत असलेल्या कामगिरीलाच महत्त्व असून अन्य गोष्टी हे क्रिकेटपटू मनाच्या समाधानासाठी करतात. मजेची गोष्ट अशी की, रोहित एक-दोन नाही तर चार गोष्टींवरती अंधविश्वास ठेवतो. रोहित मैदानावर उतरण्यापुर्वी ४ गोष्टी नक्की करत असतो. त्याला वाटते की, या गोष्टी केल्यामुळे त्याला मानसिकतेने मजबूत झाल्याप्रमाणे वाटते. Rohit sharma’s 4 Superstitions Which Made Him Great Batsman
त्या ४ अंधविश्वासांपैकी एक गोष्ट म्हणजे. रोहित सामन्यापुर्वी नेहमी कॉफी पितो. विशेषत तो काचेच्या ग्लासमध्येच कॉफी प्यायला जास्त प्राधान्य देतो. दुसरे म्हणजे, रोहित मैदानावर उतरण्यापुर्वी त्याची पत्नि रितिकाला नक्की फोन करतो. संघाच्या मिटिंगपुर्वी रितिकाला फोन करणे हा रोहितच्या सवयीचा एक भाग आहे.
रोहितचा तिसरा अंधविश्वास असा आहे की, तो नेहमी मैदानावर त्याचा उजवा पाय ठेवतो आणि त्यानंतर मैदानावर अशा भागाची निवड करतो ज्याला बघून त्याच्या मनाला शांती मिळते. जेव्हाही सामन्यादरम्यान रोहितवर दबाव येतो, तेव्हा तो एकटक दृष्टीने त्या निवडलेल्या भागाकडे पाहत असतो. यामुळे त्याच्यावरील दबाव कमी होतो.
रोहितच्या चौथा अंधविश्वासात त्याच्या पत्नि रितिकाची भूमिका आहे. रोहित जेव्हाही फलंदाजी करत असतो, तेव्हा रितिका तिच्या दोन्ही हाताच्या बोटांना क्रॉस करुन ठेवते. जेव्हा रोहित बाद होतो तोव्हाच ती त्या क्रॉसला खोलते.
तसे पाहिले तर, रितिकाशी लग्न झाल्यापासून रोहितच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. रोहित आणि रितिकाचे लग्न १३ डिसेंबर २०१५ला झाले होते. तेव्हापासून रोहितने ८० वनडे सामने खेळत ६४.९७च्या सरासरीने ४५४८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २१ शतकांचा आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी२०मध्ये त्याने ३ शतके केली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्येही रोहितने लग्नानंतर जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याने २४ कसोटी सामन्यात ६५.४२च्या सरासरीने १२४५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. कदाचित हेच कारण असेल, ज्यामुळे रोहित शतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या हातातील अंगठी घातलेल्या बोटाला चुंबन घेत असतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
डीडीएलजेचा ट्रेनवाला फेमस किस्सा, तोही या भारतीय खेळाडूबरोबर
प्रेक्षकांविना सामने खेळवण्याबद्दल बीसीसीआयचे मोठे भाष्य
रोहित शर्माला लॉकडाऊनदरम्यान या गोष्टीची येतेय सर्वात जास्त आठवण