रणजी ट्रॉफी 2023-24चा शेवट रोमांचक झाला. अंतिम सामन्यात मुंबई आणि विदर्भ यांच्यातील लढत पाहण्यासारखी होती. मुंबईने 169 धावांनी हा सामना जिंकला आणि रणजी ट्रॉफीचे 42वे विजेतेपद देखील नावावर केले. धवल कुलकर्णी याच्यासाठी हा शेवटचा रणजी सामना होता आणि त्याने संघासाठी शेवटची विकेट देखील घेतली. भारतीय दिग्गज रोहित शर्मा याने त्याचा जुना सहकारी असलेल्या धवलसाठी खास पोस्ट केली.
गुरुवारी (14 मार्च) रणजी ट्रॉफी 2024च्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील मुंबईने विदर्भला मात दिली. या विजयासह मुंबईने रणजी ट्रॉफीत आपली बादशाहत कायम ठेवली. मुंबई संघासाठी हा आनंदाचा क्षण असला, तर धवल कुलकर्णी () भावूक झाला होता. कारण त्याने या सामन्यापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे वेगवान गोलंदाज आता यापुढे प्रोफेशनल क्रिकेट खेळताना दिसणार नाहीये. कारकिर्दीतील शेवटच्या रणजी सामन्यात धवलने मुंबईला विजय मिळवून दिला. त्याचा मित्र आणि माजी सहकारी रोहित शर्मा याने वेगवान गोलंदाजाला निवृत्तीच्या खास शुभेच्छा दिल्या.
धवल कुलकर्णी आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यात चांगली जुगलबंदी आहे. दोघांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र अनेक सामने खेळले आहेत. रोहितने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून धवलला निवृत्तीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. “मुंबईचा योद्धा. एवढ्या चांगल्या कारकिर्दीसाठी खूप-खूप शुभेच्छा.”
धवल कुलकर्णी याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर भारतीय संघासाठी त्याने 12 वनडे आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे 19 आणि 3 विकेट्स त्याने नावावर केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या 15 वर्षांमध्ये वेगवान गोलंदाज खेळत आला आहे. 35 वर्षीय खेळाडूने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. कारकिर्दीत 96 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 285 विकेट्स त्याने घेतल्या. शेवटच्या रणजी सामन्यात त्याने 4 विकेट्स नावावर केल्या. (Rohit Sharma’s Instagram tribute to Dhawal Kulkarni: ‘The warrior of Mumbai’.)
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy Final : मुंबईचा संघ ठरला 2024 चा रणजी चॅम्पियन, मुशीर खान ‘मॅन ऑफ द मॅच’
मोठी बातमी! श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लाहिरू थिरिमनेचा भीषण कार अपघात, अन्…