---Advertisement---

हॅप्पी बर्थडे डार्लिंग..! पत्नी रितिकाच्या वाढदिवसानिमित्त रोहितची सुपर’हिट’ पोस्ट

On: सोमवार, डिसेंबर 21, 2020 12:17 PM
---Advertisement---

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट विस्फोटक फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिचा आज (२१ डिसेंबर) वाढदिवस आहे. ती आपला ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितने या खासदिनी सोशल मीडियाद्वारे आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर काही दिवसांपुर्वीच त्याने ऑस्ट्रेलियासाठी उड्डाण भरले होते. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो भारतीय संघात सामील होईल.

रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रितीकासोबतचे वेगवेगळ्या क्षणांचे फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या सर्व फोटोंमध्ये ही जोडी खूप सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये तर रोहित जणू रितीकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका विशेष ठिकाणी घेऊन गेल्यासारखे दिसत आहे. त्यांच्यापुढील टेबलवर फुलांचे बरेच गुच्छेदेखील ठेवलेले आहेत. या पोस्टला कॅप्शन देत रोहितने लिहिले की, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा डार्लिंग, माझे तुझ्यावरील प्रेम आयुष्यभर कायम राहिल.”

https://www.instagram.com/p/CJCt64YhXMI/?utm_source=ig_web_button_share_sheet

लग्नाच्या वाढदिवसादिवशी लगावले होते तिसरे वनडे द्विशतक

रोहितने १३ डिसेंबर २०१५ रोजी रितीका बरोबर विवाह केला होता. रितीका अष्टपैलू युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. तसेच लग्नापुर्वी ती तिच्या चुलत भावाची कंपनी काॅर्नरस्टोन स्पोर्ट्स व इंटरटेनमेंटमध्ये स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून काम करत होती. रोहितसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्याच्या सर्व व्यावसायिक करारांची जबाबदारी रितीकाने सांभाळली आहे. ती रोहितची मॅनेजरदेखील आहे.

क्रिकेटजगतातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले हे जोडपे नेहमी चर्चेत असते. विशेष म्हणजे, विराटने २०१७ साली त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी रितीकाला अविस्मरणीय भेट दिली होती. याच दिवशी रोहितने त्याच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक लगावले होते. श्रीलंकेविरुद्ध नाबाद २०८ धावांची खेळी केली करत त्याने हा विक्रम नोंदवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘विरुष्का’च्या पहिल्या भेटीचा रोमांचक किस्सा, पाहा कुठे आणि कसे जुळले नाते

विराट कोहली आणि पृथ्वी शॉ ऐवजी ‘या’ दोन खेळाडूंना मिळावी टीम इंडियात संधी, दिग्गजाची मागणी

व्हिडिओ: तूला मानलं पाहिजे भावा! ‘या’ ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने अवघ्या १५ चेंडूत ठोकले अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---