भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान ४ मार्चपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ आपली बेंच स्ट्रेंथ आजमावू शकतो. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा व वृद्धिमान साहा हे अनुभवी खेळाडू खराब कामगिरीमुळे संघाबाहेर केले गेले आहे. कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या पुनरागमनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहितने सकारात्मक उत्तर दिले.
काय म्हणाला रोहित?
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उतरण्यापूर्वी रोहित पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याला अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ते संघात पुनरागमन करू शकतात का? असे विचारल्यानंतर रोहित म्हणाला,
“अजिंक्य आणि पुजाराची जागा भरून काढणे सोपे नाही. त्यांच्या जागेवर कोण येणार हे मला माहीत नाही. या दोघांनी संघासाठी व देशासाठी काय केले आहे हे नव्याने सांगायला नको. ८०-९० कसोटी सामने खेळणे सोपी गोष्ट नसते. संघाच्या विजयात व संघाला पहिल्या क्रमांकावर नेण्यात त्यांचे मोठे योगदान होते. ते पुन्हा संघात दिसणार नाही असे काही नाही. ते अजूनही आमच्या योजनांचा भाग आहेत.”
सततच्या खराब कामगिरीमुळे रहाणे व पुजारा यांना दक्षिण आफ्रिका दौ-यानंतर संघातून बाहेर करण्यात आले होते. सध्या हे दोघेही रणजी ट्रॉफीमध्ये आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. रहाणेने सौराष्ट्रविरूद्ध शानदार शतक करत कौतुक वसूल केले होते. तर, पुजारा पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने ९२ धावांची शानदार खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
खरी खिलाडूवृत्ती! केवळ संघहित लक्षात घेत विहारीने केली होती संघातून वगळण्याची मागणी (mahasports.in)